आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळशेज घाटात दरड कोसळून ट्रकचा चुराडा, वाहतूक पूर्णपणे ठप्प, आणखी काही जण अडकल्याची भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ठाणे-पुणे या महामार्गावरील माळशेज घाटात दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची घटना रात्री अडीच वाजेदरम्यान घडली. 

 

माळशेज घाटातल्या बोगद्याजवळ रात्री अडीच वाजेच्या सुमारास दरड कोसळून एक ट्रकचा चुराडा झाला आहे. यात ट्रकचालक अमोल दहिफळे गंभीर झाला असून आणखीही काही जण अडकलेले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे. परंतु, घाटात धुकं आणि पाऊस असल्याने या कामात अडथळे येत आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.

खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...