आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया : जमीन खचल्यानंतर महामार्गावर पाण्याचे लोट; सतर्कतेमुळे अपघात टळले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- रशियाच्या राजधानीत एका भुयारी वाहतूक मार्गावर पूर आल्याची घटना घडली आहे. सध्या देशात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यातच जमीन खचल्याने महामार्गावर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे काही वेळ वाहनांचा खोळंबा झाला होता. रशियात गुरुवारी उणे सात अंश तापमान होते. 

 

सतर्कतेमुळे अपघात टळले 
भूगर्भातील पाण्याचा साठा अचानक बोगद्यात आला तेव्हा अनेक वाहन चालकांना काय चालले आहे, हे समजलेच नाही. मात्र सतर्कता बाळगत वाहनचालकांनी गाड्या चालवल्या. त्यामुळे अपघात टळले. सतत धावणारा हा भुयारी मार्ग पुरामुळे काहीवेळ ठप्प झाला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने मार्गावरील पाणी हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली होती.नंतर वाहतूक सुरळीत झाली. 

बातम्या आणखी आहेत...