आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Landslide On Kedarnath Highway; 3 Vehicle Collapse In 400 Meter Deep Valley, 8 Died

केदारनाथ हायवेवर भूस्खलन; 3 गाड्या 400 मीटर खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहरादून- उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलनामुळे एक कार आणि दोन मोटरसायकल 400 मीटर खोल दरीत कोसळल्या. शनिवारी संध्याकाळी उशीरा झालेल्या या अपघातामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दरीत पडल्यानंतर या वाहणांवर डोंगरावरुन आलेली एक मोठी दरड पडली. रुद्रप्रयागचे अपघात नियंत्रक अधिकारी हरीशचंद्र शर्माने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी रंजीत शर्मा, हासिद आणि रवी कुमार हे तिघे जखमी अवस्थेत सापडले. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर
तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले, पण रात्री अंधार असल्यामुळे कामात अडथळे येत होते.

आज सकाळी सापडले पाच मृतदेह
 
आज(रविवार) सकाळी बचाव पथकास 5 मृतदेह सापडले. उंचीवरुन पडल्यामुळे सर्व मृतदेह छिन्न-विछीन्न अवस्थेत पडले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटनेही अवघड होती. रुद्रप्रयागचे जिल्हा मजिस्ट्रेट मंगेश गिलडियाल यांनी सांगितले की, कारमधील नागरिक केदारनथा मंदिरातून परत येत होते.