आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Laptop चोरल्यानंतर चोरट्याने पाठवला इतका भावुक ई-मेल; वाचून लोट-पोट झाले लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंघम - एखाद्याचे लॅपटॉप चोरीला जावे आणि लोकांना त्या चोरावरच दया यावी अशी अजब घटना अमेरिकेत समोर आली. येथील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचे लॅपटॉप चोरीला गेले. त्याने यासंदर्भात आपल्या रुम पार्टनरला सांगितले. यानंतर रुम पार्टनरने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. तेव्हापासूनच लोकांना त्या विद्यार्थ्याच्या परिस्थितीवर हसू आणि चोरावर दया येत आहे. 72 हजार लोकांनी ट्वीट केलेली आणि अडीच लाख लोकांनी लाइक केलेली ही पोस्ट लोक वाचून लोट-पोट होत आहेत. कारण आहे, त्या चोराने लॅपटॉप लंपास केल्यानंतर विद्यार्थ्याला पाठवलेला भावनिक संदेश...


बर्मिंघम येथील विद्यापीठात शिकणारा स्टीव्ह व्हॅलेन्टाइन आपल्या फ्लॅटवर आला तेव्हा त्याचा रुम पार्टनर लॅपटॉप हरवल्याच्या दुखात होता. त्याने स्टीव्हला एक ई-मेल दाखवला. तो ई-मेल त्याच चोराने पाठवला होता. चोराचे पत्र इतके भावुक आणि हास्यास्पद होते की स्टीव्हने ते ट्वीट करण्याचा निर्णय घेतला. ट्वीट केल्याच्या अवघ्या काही तासांत ते जगभरात व्हायरल झाले. 


वाचा त्याचे गंमतीशीर पत्र...
यामध्ये चोराने लिहिले, हॅलो मित्रा, "I am very very sorry की मी तुझा लॅपटॉप चोरला. मी खूप गरीब असून मला पैश्यांची गरज आहे. मी तुझा मोबाईल आणि वॅलेट तसाच सोडून दिला. ते तुझ्यासाठी काही तरी चांगले ठरेल असे मला वाटते."
"मला माहिती आहे, समजू शकतो की तू एक विद्यार्थी आहेस. या लॅपटॉपमध्ये तुझ्या काही शैक्षणिक किंवा इतर महत्वाच्या फाईल असतील तर निश्चिंत राहा. मला मेल करशील. मी तुला सगळ्या फाईल परत पाठवेन. पुन्हा एकदा मला माफ कर."

 

So my flat mates laptop got stolen today, please pree what the thief sent him 😂😂😂😂 pic.twitter.com/pDhhpmncPz

— Stevie Valentine (@StevieBlessed) November 28, 2018

बिचाऱ्याला चार्जरही देच...
या ट्वीटला हजारो कॉमेंट्स आले आहेत. प्रत्येक कॉमेंट एकापेक्षा एक गंमतीशीर आहे. एकाने लिहिले, 'मित्रा बघ हा चोर किती प्रामाणिक आहे. त्याला तू चार्जर सुद्धा द्यायला हवा.' दुसऱ्याने लिहिले, 'किती गरीबी मला तर दया येत आहे. विद्यार्थ्यावर नाही त्या चोराच्या परिस्थितीवर..!' काहींनी हा एका चोराचा चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा आहे असे म्हटले. तर काहींनी विद्यार्थी सुद्धा गरीब असतात असे म्हटले. त्यात एकाने तर हा ट्वीट करणाऱ्या तुझ्या मित्राचा डाव असू शकतो, अशी शंका व्यक्त केली.

 

बातम्या आणखी आहेत...