आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर येथे होण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- औष्णिक वीज केंद्रामुळे सर्वाधिक प्रदूषणांच्या यादीत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातच सौर उर्जेचा विदर्भातील सर्वात मोठा वीज प्रकल्प होण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. हा प्रकल्प १०० मेगा वॉ़ट क्षमतेचा राहू शकतो व तो खासगी क्षेत्राकडून उभारला जाईल, यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 


चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील २१० मेगावॉटचे दोन संच अत्यंत जुने असून त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असल्याने ते बंद ठेवण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या बंद पडलेल्या अॅश बँड च्या २९० हेक्टर जागेवर सौर उर्जेचे पॅनल्स बसवले जाऊ शकतात. त्यासाठीची प्रक्रिया महानिर्मितीने सुरु केली असून अनेक खासगी कंपन्यांनी त्यासाठी रस दाखविला असल्याचा महानिर्मितीचा दावा आहे. या प्रकल्पासाठी महानिर्मिती फक्त जागा देणार आहे. प्रकल्पाची उभारणी खासगी कंपनीलाच करावयाची असून या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरण खरेदी करेल, अशी योजना आहे. राज्यात नजिकच्या भविष्यात सौर उर्जा निर्मितीची क्षमता सुमारे अडीच हजार मेगावॉटपर्यंत नेण्याची महानिर्मितीची योजना आहे. 

बातम्या आणखी आहेत...