आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दोन नाही तर तब्‍बल 20 मुलांना जन्‍म दिलाय या महिलेने, आता म्‍हणते '' ना बाबा ना! ''

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्टर्न कन्ट्रिज मध्ये दाम्पत्याने बाळाला जन्म देणे ही एक मोठी जबाबदारी मानली जाते. त्‍यांना बाळापेक्षा कुत्रे, मांजर संभाळणे सोप वाटते. ब्रॅंडनमध्ये राहणा-या एका दाम्पत्याने मात्र 20 मुलांना जन्‍म दिला आहे. विशेष गोष्‍ट ही आहे की, ही सर्व मुले त्‍यांनी एकाच जोडीदारापासुन जन्‍माला घातली आहे. ब-याच वेळेस होत असं की येथील लोक वेगवेगळया बायकांपासुन मुलं जन्‍माला घालतात.


आता हे शेवटचं मुल!
ब्रिटन मधील सर्वात मोठा परिवार ब्रॅडफोर्ट्सने काही महिन्यांपूर्वीच आपल्‍या विसाव्‍या मुलाला जन्‍म दिलाय. आता हे शेवटच मुल असल्‍याचे ते सांगतात. यानंतर ते आता बाळाला जन्‍म देणार नाहीत. 42 वर्षांची पत्‍नी आणि पतीचे 46 वर्षे वय असलेल्‍या जोडप्‍याने मागील तीस वर्षांत एक दोन नाही तर तब्‍बल 20 मुलांना जन्‍म दिला आहे. '19 किड्स एंड काउंटिंग' या कार्यक्रमात हे कुटुंब सहभागी झालं होतं. या परिवारातील मोठा मुलगा हा 28 वर्षांचा आहे तर सर्वात लहान मुलाचा काही महिन्यांपूर्वीच जन्‍म झाला. कार्यक्रमात ब्रॅडफोर्ट्स परिवाराने म्‍हटले, मुलांच्‍या अंघोळीसाठी कित्‍येक किलो शॅम्पू लागतो.


कसे देतात जेवण 
ख्रिसमसमध्‍ये 3 टर्की, 3.5 किलो बटाटे, 56 पुडिंग आणि असंख्‍य भाज्‍या आणल्यानंतर सर्वांचे पोट भरत असल्याचे हे दाम्पत्य सांगतात.


वयाच्‍या 14 व्‍या वर्षीच पहिल्‍या मुलाचा जन्‍म
क्रिस आणि नोएल यांचे बालपणापासूनच एकमेकांवर प्रेम आहे. वयाच्‍या 14 व्‍या वर्षीच क्रिस पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. आता तर त्‍यांना 3 नातवंडही आहेत. 


मुलांचा वार्षिक खर्च 
क्रिस आणि नोएल आपल्‍या मुलांवर एका वर्षात 26 लाख रूपये खर्च करतात. त्‍यांच्‍या वाढदिवस आणि परदेशांमधील सुटीच्या खर्चाचा यामध्ये समावेश आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, या कुटुंबाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...