Home | National | Other State | laser light pointed at rahul gandhi congress writes to home ministry on alleged attack plot

लेझर गनच्या निशाण्यावर होते राहुल गांधी? पत्रकारांशी बोलताना चेहऱ्यावर होते ग्रीन लेझर लाइट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 05:42 PM IST

काँग्रेसने गृह खात्याला लिहिलेल्या पत्रात राजीव गांधी, इंदिरा गांधींच्या हत्येचा उल्लेख केला

  • laser light pointed at rahul gandhi congress writes to home ministry on alleged attack plot

    अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक ग्रीन लेझर लाइट दिसून आला. काँग्रेसने ही घटना सुरक्षेतील मोठी चूक म्हटले आहे. पक्षाने आरोप केला की राहुल गांधींना लक्ष्य केले जात आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात एसपीजीच्या संचालकांनी यासंदर्भात गृहमंत्रालयाला एक अहवाल सादर केला. त्यामध्ये हे ग्रीन लाइट एका मोबाईलचे होते असे सांगण्यात आले आहे. काँग्रेस समर्थक राहुल यांचे फोटो घेत होते त्याचवेळी लाइट चमकल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.


    गृहमंत्रालयास पत्र, स्नाइपर गन असल्याचा आरोप
    काँग्रेसने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना स्नाइपर गनने टार्गेट केले जात होते. त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येणारी ग्रीन लाइट त्याच स्नाइपर रायफलची होती. ही लाइट धोक्याची घंटा आहे. काँग्रेसने गृहमंत्रालयास लिहिलेल्या पत्रामध्ये राहुल गांधींचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख देखील केला. दरम्यान, राबुल गांधींनी वायनाड येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमेठी येथूनही अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी वढेरा, रॉबर्ट वढेरा आणि त्यांच्या दोन मुलांनी रोडशोमध्ये सहभाग घेतला होता.

Trending