आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात प्रथमच शासकीय रुग्णालयात झाली प्रोस्टेट ग्रंथीवर लेझर शस्त्रक्रिया

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे अत्याधुनिक अशा लेझर प्रणालीद्वारे प्रोेस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया करणारे पहिलेच महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय ठरले आहे. शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल मुंडे यांनी ग्रीन लाइट लेझरद्वारे पाच रुग्णांवर ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वी 
केली आहे.

डॉ. अनिल मुंडे यांनी सांगितले की, ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया महाराष्ट्रात दोन ते तीन खासगी रुग्णालयात होते. या शस्त्रक्रियेचा खर्च  सर्वसामान्य रुग्णाला परवडणारा नसतो. आजपर्यंत राज्यातील एकाही शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झालेली नाही. आम्ही लातूरमध्ये हे आव्हान स्वीकारले आणि पाच रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली असा दावा मुंडे यांनी केला. त्यांनी सांगितले की, या शस्त्र क्रियेत कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव होत नाही. तसेच कमी वेळात ही शस्त्रक्रिया पार पडते. त्यामुळे रक्ताचे दोष असणाऱ्या रुग्णात तसेच हृदयाचे ऑपरेशन झालेल्या रुग्णात तसेच रक्तदाब व हृदयरोग असणाऱ्या रुग्णांसाठी ही लेझर प्रणाली एक वरदान आहे. 

शस्त्रक्रियेनंतर दुस़ऱ्याच दिवशी रुग्णाला सुटी मिळते. संबंधित विकाराच्या रुग्णांनी अशा प्रकारच्या लेझर शस्त्रक्रियेसाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन  अधिष्ठाता, डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. मंगेश सेलूकर उपअधिष्ठाता, डॉ. उमेश लाड उपअधिष्ठाता, डॉ. संतोषकुमार डोपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल मुंडे यांनी केले आहे.बातम्या आणखी आहेत...