आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11: कसाब सीएसटीवर अंदाधुंद गोळीबार करत होता, जणू व्हिडिओ गेमच खेळत आहे; रेल्वे उदघोषकाला आठवला तो काळा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्या हल्ल्यात 166 जणांचा मृत्‍यू झाला त्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते. 21 नोव्हेंबर 2012 ला त्याला फासावर लटकविण्यात आले होते. परंतु आजही या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. हल्ला झाला तेव्हा CST स्टेशनवर रेल्वे उद्घोषक बबलु कुमार दीपक हेही होते.

 

> 'लष्कर-ए-तोयबा'चा क्रुरकर्मा दहशतवादी अजमल आमिर कसाबविषयी बोलताना दीपक यांनी सांगितले की, 'कसाब कॉलेज तरुणासारखा दिसत होता. लोकांवर अंदाधूंद गोळीबार सुरु असताना तिथे बसून तो व्हिडिओ गेम खेळत होता. दीपक हे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. स्टेशनवर हल्ला झाला तेव्हा दीपक ड्युटीवर होते. दीपक हे संपूर्ण हल्ल्याचे साक्षीदार आहेत. हल्ला झाला तेव्हा दीपक यांनीच रेल्वे कंट्रोल रुमला माहिती दिली होती.

 

26/11 च्या हल्ल्यात जखमी झालेल्या दीपक यांनी सांगितल्या आठवणी...

26 नोव्हेंबर 2008 रोजी सकाळी सात वाजता दीपक ड्युटीसाठी भायखळा स्टेशनवर पोहोचले. ड्युटी संपल्यानंतर अतिरिक्त काम आल्याने ते CSMT स्टेशनवर पोहोचले. दीपक यांनी सांगितले, 'त्या दिवशी हुसेन सागर एक्स्प्रेस (मुंबई-हैदराबाद) रात्री 9.30 वाजता स्टेशनवरुन निघाली आणि इंद्रायणी एक्सप्रेस आली. त्यावेळी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर स्फोटाचा भीषण आवाज झाला आणि गोंधळ उडाला. ते पाहण्यासाठी मी तिथे पोहोचलो तेव्हा माझ्या डोळ्यांनी लोकांना मरताना पाहिले. गोळीबार सुरु असताना कसाब मोठमोठ्याने हसत होता. त्यानंतर दीपक यांनी जिव धोक्यात घालून तातडीने लोकांना प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरून दूर जाण्याची उद्घोषणा केली.

 

तब्बल 27 तास तिथेच लपून बसले होते दीपक

हल्ला झाल्यानंतर दीपक तब्बल 27 तास स्टेशनवर लपून बसले होते. त्यानंतर बचाव पथकाने त्यांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दीपक यांनी सांग‍ितले की, 'मला अजुनही आठवते की दहशतवादी गोळीबार करत होते, तेव्हा तेथील हमाल स्वत:चे जीव धोक्यात घालून जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. आजही ती घटना आणि कसाबचा चेहरा मला आठवतो.'


शौर्य पुरस्काराने गौरवीत
स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवणाऱ्या बबलु कुमार दीपक यांना सेंट्रल रेल्वे शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...