निधनापूर्वी पर्रिकरांनी कुटुंबियांसोबत काढलेला हा शेवटचा फोटो, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम

Mar 18,2019 11:43:00 AM IST

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पर्रिकरांच्या निधनाचे वृत्त समोर येताच देशभरातील नेत्यांसह सामान्य जनता सुद्धा शोकाकुल आहे. एक प्रामाणिक आणि कामाप्रति निष्ठावान नेते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते. याच दरम्यान, आता त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी हा फोटो 13 मार्च रोजी आपले पुत्र उत्पल आणि सून उमा यांच्यासोबत काढला होता. कुटुंबियांसोबत काढलेला हा त्यांचा शेवटचा फोटो मानला जात आहे.


या फोटोमध्ये पर्रिकर एका खुर्चीवर बसलेले आहेत. तर त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा आणि सून आहेत. यासोबत त्यांनी आपल्या हातात एक झेंडा पकडलेला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा आहे. आजारपणामुळे साधे उभे सुद्धा येऊ शकणार नाही अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या पक्षाचा मान वाढवत त्याचा झेंडा हातात धरला होता. मनोहर पर्रिकर यांचा हा फोटो भाजप कार्यकर्त्यांसह भाजपचे नेते सुद्धा पोस्ट करत आहेत. सामान्य जनतेमध्ये सुद्धा या फोटोची चर्चा होत आहे. निधनाच्या अवघ्या 4 दिवसांपूर्वी काढलेला हा फोटो पक्ष आणि आपल्या जबाबदारीविषयी त्यांची निष्ठा सिद्ध करणारा आहे.

X
COMMENT