आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Last Rites And Funeral Prayer Of Kader Khan Held In Canada

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलविदा / सुपुर्द-ए-खाक झाले कादर खान, मुलाने सांगितले - वडिलांना कायम वाटायचे त्यांच्या अंत्यविधीत कुणीही येणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांचे 31 डिसेंबर 2018 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास कॅनडात निधन झाले. दीर्घ आजारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली होती. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. कॅनडातच त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रेयर मीटमध्ये कादर खान यांची तिन्ही मुले अब्दुल, सरफराज आणि शहनवाज यांनी त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. मुलगा सरफराजने प्रेयर मीटमध्ये सांगितले की, आपल्या अंत्यविधीला कुणीही येणार नाही, अशी चिंता कायम कादर खान यांना कायम वाटत असे.

 

थांबत नव्हते अश्रू : सरफराजने उपस्थितांना सांगितले की, माझे वडील त्यांच्या चाहत्यांवर खूप प्रेम करायचे. त्यांनी कधीही मुले आणि चाहत्यांमध्ये अंतर समजले नाही. ते म्हणायचे की, जर तुमच्या तिघांपैकी कुणी माझा साभांळ केला नाही, तर चाहत्यांपैकी कुणी तरी नक्कीच करेल. व्हिडिओत कादर खान यांची मुले त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधी करताना दिसत आहेत. यावेळी तिघांनाही अश्रू अनावर झाले होते.  


इंस्टाग्रामवर शेअर झाले फोटोज : कादर खान यांच्या पार्थिवार 2 जानेवारी रोजी अंत्यविधी करण्यात आले. कॅनडात झालेल्या अंत्यविधीचे फोटोज टोरंटो मुस्लिम नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर झाले आहेत.