आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री डिंपल कपाडियाला मातृशोक, अक्षय कुमार, सनी देओल, ऋषी कपूर यांनी दिला अखेरचा निरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे वर - बेट्टी कपाडियासोबत अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा, खाली बेट्टी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी सनी देओल आणि अक्षय कुमार, मध्यभागी - डिंपल कपाडिया आणि उजवीकडे - ऋषी कपूर - Divya Marathi
डावीकडे वर - बेट्टी कपाडियासोबत अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा, खाली बेट्टी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी सनी देओल आणि अक्षय कुमार, मध्यभागी - डिंपल कपाडिया आणि उजवीकडे - ऋषी कपूर

बॉलिवूड डेस्कः ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या मातोश्री आई आणि ट्विंकल खन्नाची आजी बट्टी कपाडिया यांचे रविवारी पहाटे 4 च्या सुमारास निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्या रुग्णालयात भरती होत्या. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी अक्षय कुमार आपल्या कुटुंबाला सांभाळताना दिसला.


डिंपल यांचं सांत्वन करण्यासाठी सकाळपासूनच बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी आल्याचं दिसून आलं. सोबतच सनी देओल, ऋषी कपूर याच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी बेट्टी यांना आदरांजलीही वाहिली.