आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता दीदी@89: लता नव्हे हेमा होते नाव, स्लो पॉइजन देऊन जीवे मारण्याचा करण्यात आला होता प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. लतादीदींचा आज 89 वा वाढदिवस आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात त्यांचा झाला. लता या त्यांच्या आई-वडिलांच्या ज्येष्ठ कन्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लता दीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.   


हेमा होते नाव... 
लता दीदी यांचं नाव हेमा असं ठेवण्यात आलं होतं. पण, दिनानाथ मंगेशकर यांच्या ' भावबंध' या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी हेमा नाव बदलून लता असं ठेवलं. लता दीदींच्या आईचे नाव शुद्धमती त्यांना सर्व जण 'माई' या नावाने संबोधत होते.  

 

पहिले गाणे गायल्यावर मिळाले होते 25 रुपये- 
लता यांना पहिल्यांदा स्टेजवर गाणे गाण्यासाठी 25 रुपये मिळाले होते. याला त्या पहिली कमाई मानतात. लताजी यांनी पहिल्यांदाच 1942मध्ये मराठी सिनेमा 'पहिली मंगळागौर'साठी गाणे गायले होते. लता यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले यांनी सर्वांनी संगीत क्षेत्राचीच निवड केली आहे.

 

का नाही केले लग्न? 
लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही. याचे उत्तर त्या स्वत: देतात. लता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की घरात सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर होती. अशावेळी अनेकदा लग्नाचा विचार मनात आला मात्र तो प्रत्यक्षात कधीच अंमलात आणला नाही. खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती. 1942 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी लताजी यांच्या डोक्यावरून वडिलांची सावली हरपली. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.

 

केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या दीदी... 

लता दीदी केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. शाळेत गेल्यानंतर दीदींनी आपल्या वर्गातील मुलांना गाणे शिकवणे सुरु केले होते. शिक्षकांनी त्यांना रागावल्यानंतर दीदी नाराज झाल्या आणि त्यानंतर त्या कधीच शाळेत गेल्या नाही.

 

सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका कराव्या लागल्या- 
लता मंगेशकर यांचे वडील शास्त्रीय संगीताचे खूप मोठे प्रशंसक होते, म्हणून कदाचित ते लताजी यांच्या गायनाच्या विरोधात होते. 1942मध्ये त्यांच्या वडीलाचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची अर्थित स्थित ढासळली आणि लता यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांत छोट्या-छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली. लता दीदींनी 1942 ते 1948 या काळात आठ सिनेमांमध्ये काम केले. 'पहिली मंगळा गौर' हा लता दीदींचा पहिला सिनेमा होता.   

 

लता दीदींना देण्यात आले होते स्लो पॉइजन...
1962 साली लता दीदी 32 वर्षांचा असताना त्यांना स्लो पॉइजन देण्यात आले होते. लतादीदी यांच्या निकटवर्तीय पद्मा सचदेव यांनी 'ऐसा कहाँ से लाऊं' या पुस्तकात या घटनेबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यानंतर लेखक मजरुह सुल्तानपुरी अनेक दिवस लता दीदींच्या घरी जाऊन स्वतः जेवण चाखून मग लता दीदींना देत असतं, असा उल्लेख पद्मा सचदेव यांच्या पुस्तकात आहे. मात्र लता दीदींना जीवे मारण्याचा कुणी आणि का प्रयत्न केला होता, याचा उलगडा आजही झालेला नाही.

 

गेल्या सहा ते सात दशकांत त्यांनी नऊशेहून अधिक हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. याशिवाय इतर 37 प्रादेशिक भाषांमधूनही त्यांनी गाणी गायली. त्यांनी गायलेल्या गाण्यांची एकूण संख्या 25 हजारांपेक्षाही जास्त असावी. सहा दशकांहून अधिकचा काळ लतादीदींनी आपल्या सुरेल आवाजाने गाजवला आहे. लता दीदी सोशल मीडियावरसुद्धा अॅक्टिव असतात.  

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा गानकोकिळेचा दुर्मिळ छायाचित्रांचा हा खजिना.... 

 

बातम्या आणखी आहेत...