आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाचा ‘गानसम्राज्ञी लतामंगेशकर पुरस्कार’ संगीतकार राम-लक्ष्‍मण यांना, विनोद तावडेंनी केली घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्‍ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘गानसम्राज्ञी लतामंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण यांना जाहीर  झाला आहे. सांस्‍कृतिक कार्यमंत्री  विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. तसेच विजय पाटील यांना स्‍वत: फोन करून विनोद तावडे यांनी त्‍यांचे अभिनंदन केले.    

 

5 लाख रूपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे हा पुरस्काराचे स्‍वरूप आहे. दरवर्षी लतादीदींच्या वाढदिवशी हा पुरस्‍कार प्रदान करण्यात येतो.  हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोकांनी मला नेहमीच प्रेम दिले. त्‍यांनी हे प्रेम कायम ठेवावे आणि माझ्या संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल मला लक्षात ठेवावे, अशा भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केल्‍या. पुरस्काराच्या निमित्ताने प्रसिद्ध दादा कोंडके यांची आठवण येत असल्याचेही ते म्हणाले.


मराठी रसिकांच्‍या मनावर अधिराज्‍य निर्माण केले
1976 पर्यंत राम कदम व विजय पाटील ही जोडी 'राम-लक्ष्मण' ह्या नावाने संगीत द्यायचे. त्‍यांनी संगीत दिलेला पहिला सिनेमा होता 'पांडू हवालदार'. 1977 मध्ये राम कदम यांचे निधन झाल्यानंतरही विजय पाटील यांनी 'राम-लक्ष्मण' या नावानेच संगीत देणे सुरू ठेवले. 'हम से बढकर कौन' चित्रपटातलं 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली.

 

'मैने प्यार किया' या सिनेमातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी 'पत्थर के फूल', 'सातवा आस्मान', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' आदी सिनेमांना संगीत दिले आहे. त्यांनी आजवर 75 हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिले आहे. 'अंजनीच्या सुता तुला', 'खेळ कुणाला दैवाचा कळला', 'जीवन गाणे गातच रहावे', 'झाल्या तिन्ही सांजा करून', 'पिकलं जांभूळ तोडू नका' ही त्‍यांची गाणी आजही मराठी रसिकांच्‍या ओठांवर आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...