आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता दीदी@89 : लता मंगेशकरांच्या वडिलांची झाली होती दोन लग्ने, वडील मराठी तर दोन्ही आई होत्या गुजराती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची दोन लग्ने झाली होती. दोन सख्ख्या गुजराती भगिनींसोबत दीनानाथ यांचे लग्न झाले होते. दीनानाथ मुळचे मराठी होते. त्यांचे पहिले लग्न 1922 साली गुजरातच्या थलनेर (तापी नदीच्या किना-यावर वसलेले) गावातील नर्मदाबेनसोबत झाले होते. नर्मदाबेन यांचे वडील हरीदास त्याकाळातील गुजरातमधील मोठे जमीनदार होते. त्यांना नगरसेठ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात गुजराती तरुणीचे मराठी तरुणासोबत लग्न होणे, ही मोठी गोष्ट होती.

 

लग्नानंतर नर्मदाबेन यांचे नाव श्रीमती करी ठेवण्यात आले होते. लग्नाच्या चार वर्षांनी आजारपणामुळे नर्मदाबेन यांची प्राणज्योत मालवली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर 1927 मध्ये दीनानाथ यांचे नर्मदाबेन यांची धाकटी बहीण सेवंतीबेनसोबत लग्न झाले. लग्नानंतर सेवंतीबेनचे नाव बदलून सुधामती करण्यात आले. दीनानाथ आणि सुधामती यांना एकुण पाच मुले झाली. यामध्ये चार मुली - लता, मीना, आशा आणि उषा, तर एक मुलगा हृदयनाथ आहेत. लता 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
लता नव्हे हृदया आहे मुळ नाव

 

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोरमध्ये झाला. त्यांचे नाव हृदया असे ठेवण्यात आले होते, मात्र नंतर त्यांच्या वडिलांनी ते बदलून लता असे केले. 


लता दीदी 28 सप्टेंबर रोजी वयाची 89 वर्षे पूर्ण करत आहेत, यानिमित्ताने बघुयात लतादीदींची फॅमिली मेंबर्ससोबतचे Photos..

बातम्या आणखी आहेत...