आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lata Mangeshkar Get Discharge From Hospital After 28 Days, She Twitted Thank You Note For Everyone

लता मंगेशकर यांना 28 दिवसानंतर मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, घरी पोहोचल्यावर चाहत्यांचे मानले आभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांना 28 दिवसानंतर रुग्णालयातून घरी आणले गेले आहे. 90 वर्षांच्या लता दीदींनी घरी परतल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानले तर आजारपणादरम्यान त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांनाही त्या धन्यवाद म्हणाल्या. 


लता दीदींनी ट्वीट करून लिहिले, “नमस्कार. मागील 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होते. मला न्यूमोनिया झाला होता. डॉक्टरची इच्छा होती की, मी पूर्णपणे ठीक व्हावे आणि नंतरच घरी परतावे. आज मी घरी परत आले आहे. ईश्वर, माई-बाबा यांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचे प्रेम, प्रार्थनांमुळे मी आज ठीक आहे. मी तुम्हाला सर्वाणाची मनापासून आभारी आहे.”

11 नोव्हेंबरपासून हॉस्पिटलमध्ये होत्या लता मंगेशकर... 


लता दीदींना श्वास घेण्यास त्रासहोत असल्या कारणाने 11 नोव्हेंबरला रुग्णालयात आणले गेले होते. यापूर्वी लता दीदींनी 28 सप्टेंबरला आपला 90 वा वाढदिवस साजरा केला होता. चित्रपटात 25 हजारपेक्षा जास्त गाणी गायलेल्या लता दीदींना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...