आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता दीदींनी आपल्या डोळ्यांदेखत बघितला भाचा-भाचीचा मृत्यू, 3 वर्षांपूर्वी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी घडली होती भयानक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आज (28 सप्टेंबर) वयाच्या नव्वदीत पदार्पण केले आहे. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी ‘पहली मंगळागौर’या चित्रपटात अभिनय केला होता. लता दीदी दरवर्षी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करतात. पण तीन वर्षांपूर्वी लता दीदींच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी लता यांचा भाचा आणि आशा भोसले यांचे चिरंजीव आणि संगीतकार हेमंत भोसले यांचे निधन झाले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले होते.

 

वयाच्या 16 व्या वर्षी लता मंगेशकरांच्या धाकट्या बहिणीने पळून जाऊन केले होते लग्न...  

- लता मंगेशकर यांची धाकटी बहीण आशा भोसले यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाच्या गणपतराव भोसलेंसोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी गणपतराव भोसले हे 31 वर्षांचे गोते. ते लता मंगेशकर यांचे पीए होते. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन आशाताईंनी त्यांच्यासोबत लग्न केले होते. 
- लग्नाच्या काही दिवसांतच गणपतराव भोसले आशा भोसले यांना त्रास देऊ लागले. ते आशा यांना मारहाण करायचे आणि माहेरच्या मंडळींना भेट देत नसतं. 
- गणपतराव भोसले यांच्यासोबतचे संबंध अधिकच बिघडल्याने आशा भोसले यांनी त्यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 1960 साली त्यांच्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून आल्या होत्या. जेव्हा आशा भोसले यांनी गणपतराव भोसलेंचे घर सोडले तेव्हा त्या तिस-यांदा प्रेग्नेंट होत्या.
- आशा भोसले यांनी 1980 साली आर.डी.बर्मन यांच्यासोबत लग्न केले होते. आशा आणि त्यांच्या वयात सहा वर्षांचे अंतर होते. ते आशा यांच्यापेक्षा लहान होते. पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर आशाताईंनी आर.डी.बर्मन यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. त्यांचे दुसरे लग्न यशस्वी ठरले होते. आर. डी. बर्मन यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आशा भोसले त्यांच्यासोबत होत्या. 
- लग्नाच्या 14 वर्षांनी पंचम दांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने आशा पुन्हा एकदा एकट्या पडल्या, नंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही. पंचमदांचेही हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न रीता पटेलसोबत झाले होते.

 

मुलीने केली होती आत्महत्या..

- आशा भोसले यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. हेमंत आणि आनंद ही त्यांच्या मुलांची तर वर्षा हे मुलीचे नाव होते. आशा भोसले यांच्या तीन मुलींपैकी वर्षा ही दोन नंबरची मुलगी.. 1956 मध्ये जन्मलेल्या वर्षा गायिका, पत्रकार आणि लेखिका होत्या.
-आशाताईंबरोबर वर्षा भोसले यांनी काही गाणीही गायली होती. 'तालासुरांची गट्टी जमली, नाचगाण्यात मैफल रमली' हे गाणे आशा-वर्षा यांनी एकत्र गायले होते. त्याचबरोबर ‘चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?’ हे वर्षा भोसले यांनी गायलेले गाणेही अनेकांच्या आजतागायत लक्षात आहे. 
- 'टाईम्स ऑफ इंडिया' मध्ये स्तभंलेखिका म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते, तर 'रेडीफ मेल' या न्यूज वेबसाईट पोर्टलमध्येही त्यांनी काम केलं होतं.
- त्यांचा विवाह क्रीडा पत्रकार हेमंत केंकरे यांच्याशी झाला होता, पण काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. 1998 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.
- वर्षा  आईसोबत राहात होत्या. 9 सप्टेंबर 2008 रोजी त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला होता. पण वेळेत उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले होते.
- या घटनेच्या चार वर्षांनी म्हणजे 8 ऑक्टोबर 2012 रोजी मुंबईतील राहत्या घरी वर्षा यांनी डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. घटनेच्या वेळी वर्षा घरी एकट्याच होत्या.
- सकाळी दहाच्या सुमारास आशा भोसलेंच्या घरी काम करणा-या दीपाली माने यांनी दरवाजा वाजवला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही मिनिटांनी पुन्हा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने दीपाली यांनी ही बाब आशा भोसलेंच्या वाहनचालकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर वर्षा झोपल्या असाव्यात, त्यामुळे दरवाजा उघडत नसतील असे या वाहनचालकाने सांगितले. मात्र नंतर लतादीदींच्या घरातून वर्षा यांच्या हॉलमध्ये हा वाहनचालक गेला असता वर्षा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या दिसल्या होत्या. 

 

आशा भोसलेंच्या मुलाचे कर्करोगाने झाले निधन... 
-  आशा भोसले यांचे पुत्र आणि संगीत दिग्दर्शक हेमंत भोसले यांचे तीन वर्षांपूर्वी कर्करोगाच्या दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.  अनेक वर्षांपासून ते स्कॉटलंडमध्ये वास्तव्याला होते. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. हेमंत भोसले यांना एक मुलगी असून ती इंग्लडमध्ये शिकत आहे.
- आता आशा त्यांचा धाकटा मुलगा आनंदसोबत राहतात. आनंद भोसलेसुद्धा संगीतकार आहे. 

बातम्या आणखी आहेत...