आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर यांचा 'डॉटर ऑफ द नेशन' ने होणार सन्मान; 90 व्या वाढदिवशी बहाल करणार खिताब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - भारतीय चित्रपट संगीतात सात दशकांच्या अभूतपूर्व योगदानासाठी गान कोकिळा लता मंगेशकर यांना 'डॉटर ऑफ द नेशन'ची उपाधी बहाल करण्यात येणार आहे. त्यांच्या 90 व्या वाढदिवशी (28 सप्टेंबर) त्यांना हा किताब प्रदान करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या विशेष कार्यक्रमासाठी गीतकार आणि कवी प्रसून जोशी यांनी एक विशेष गाणे लिहीले आहे. 

लता दीदींचे चाहते आहेत पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांचे खूप मोठे चाहते आहेत. दीदी भारतातील सर्व आवाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा सन्मान करणे म्हणजे देशाच्या मुलीचा सन्मान करण्यासारखे आहे. त्यांना 90 व्या वाढदिवशी ही उपाधी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

लता दीदींनी 13 व्या वर्षी केली होती गायनाला सुरुवात
लता मंगेशकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती. त्यांनी आपले पहिले गाणे 'किती हसाल'(1942) या मराठी चित्रपटासाठी रेकॉर्ड केले होते. पण या गाण्याला अंतिम कट देण्यापूर्वीच ते काढून टाकण्यात आले होते. यानंतर 1943 मध्ये आलेल्या 'गजाभाऊ' या मराठी चित्रपटातील 'माता एक सपूत की दुनिया बदल दे' या हिंदी गाण्याला आपला आवाज दिला होता. याच गाण्याला त्यांचे पहिले गाणे मानले जाते. तेव्हापासून लताजी आजपर्यंत गायन क्षेत्रात आपले योगदान देत आहेत.

भारत रत्न आणि दादा साहेब फाळके पुरस्काराने करण्यात आले सन्मानित 
लताजींनी गायन क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आतापर्यंत 'परिचय', 'कोरा कागज', 'लेकिन' या तीन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यासोबत भारत सरकारच्या पद्मभूषण(1969), दादासाहेब फाळके पुरस्कार(1989), पद्म विभूषण(1999), आणि भारत रत्न(2001) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...