आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Lata Mangeshkar's Condition Improves Reports Say, May Be Discharged From Hospital Next Week

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, रिपोर्ट्सनुसार पुढील आठवड्यात रुग्णालयातून होऊ शकते सुटी 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः ज्येष्ठ गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याचे वृत्त आहे. 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.  औषधोपचारानंतर त्यांच्या छातीतील जंतूसंसर्ग थोडा नियंत्रणात  आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते.

अलीकडेच निर्माते अनुज गर्ग  लता दीदींच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, लता दीदींच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून पुढील आठवड्यात त्या घरी परततील. अनुज यांनी लता दीदींवर उपचार करणारे डॉ समदानी, डॉ जनार्धन आणि डॉ शर्मा यांनाही धन्यवाद दिले आहेत.


यापूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सप्त्नीक रुग्णालयातून जाऊन दीदींच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांनीही दीदींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते.  
 

बातम्या आणखी आहेत...