आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lata Mangeshkar's Health Is Improving, Health Updates Provided By Niece Rachana Shah

लता मंगेशकर यांच्या तब्येतीत होत आहे सुधारणा, भाची रचना शाहने दिल्या हेल्थ अपडेट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सुमारे दोन आठवड्यांपासून हॉस्पिटलमध्ये असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या तब्येतीबद्दलची ताजी माहिती त्यांची भाची रचना शाहने दिली. तिने सांगितले की, लताजींच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. मात्र अजुनपणे हे स्पष्ट झाले नाही की, त्या घरी कधी परतणार आहेत. अशातच प्रोड्युसर तनुज गर्गने सांगितले होते की, त्या पुढच्या आठवड्यापर्यंत घरी परतू शकतात. 


श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये असलेल्या लता दीदींची तब्येत सुधारत आहे. रुग्णालयात त्यांची भेट घेतलेल्या इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी हे स्पष्ट केले आहे. अशातच त्यांची भाची रचना शाहने सांगितले की, आम्ही खूप खुश आहोत, त्यांची तब्येत ठीक होत आहे. याची माहिती मिळू शकली नाहीये की, त्या अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत की, नाही. 


अशातच गानकोकिळा लता मंगेशकर यांना भेटून परतलेले फिल्ममेकर मधुर भंडारकर यांनी हेल्थ अपडेट्स दिले होते. मधुर यांनी सांगितले की, त्यांची तब्येत स्थिर आहे आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांनी इंस्टाग्रामद्वारे लता दीदींच्या तब्येतीबद्दलची माहिती आपल्या फॅन्सला दिली. यापूर्वी चित्रपट निर्माता तनुज गर्गने सांगितले होते की, गानकोकिळा आधीपेक्षा चांगल्या आहेत. आणि पुढच्या आठवड्यापर्यंत त्या घरी परतू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...