आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणू मंडलच्या प्रसिद्धीबद्दल लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले - तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - पश्चिम बंगालच्या राणाघाट येथील रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन आपले पोट भरणाऱ्या राणू मंडलने बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा है' या गाण्यामुळे राणू मंडलला प्रसिद्धीच्या झोतात आली. नुकतेच लता मंगेशकर यांनी राणूच्या प्रसिद्धीबाबत आपले मत व्यक्त केले होते. लता दीदी राणूच्या यशाबाबत आनंदी होत्या पण त्यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले की, नकक्ल केल्याने यश जास्त दिवस टिकून राहत नाही. लता मंगेशकर यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावरील लोकांनी निराश केले आहे. 

लता मंगेशकर यांच्या या विधानाचा विरोध करत अनेकांनी ट्वीट केले आहे. यातील एका सोशल मीडिया युझरने लिहिले की, ' मी लता मंगेशकर यांची खूप मोठी चाहती आहे. पण मोठे लोक लहान लोकांसोबत कसा व्यवहार करतात हे त्यांच्या या प्रतिक्रियेतून दिसून येते.'
 

तर दुसऱ्या युझरने लता मंगेशकर यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत लिहिले की, 'एक गरीब महिला आपले आयुष्य जगण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गाणे गाते. राणू मंडल यांच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्या सुपरस्टार झाल्या. लताजी थोड्या आणखी दयाळू होऊ शकल्या असत्या. राणून यांचे कौतुक तसेच त्यांची मदत करु शकल्या असत्या. नक्कलवर त्यांनी केलेले विधान दुर्लक्षित करण्याजोगे आहे.'  

 

बातम्या आणखी आहेत...