आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Late Actor Vinod Khanna's Son Sakshi Becomes A Monk! Admitted To Spiritual Master Osho's Ashram

विनोद खन्नांचा मुलगा साक्षी होणार संन्यासी! आध्यात्मिक गुरु ओशोच्या आश्रमात घेतला प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  बॉलिवूड डेस्कः दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा धाकटा मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आध्यात्माकडे वळला असून त्याने संन्यास घेतला आहे. बातम्यांनुसार, साक्षीने आध्यात्मिक गुरु ओशोंच्या आश्रमात प्रवेश घेतला आहे. अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 80 च्या दशकात करिअर यशोशिखरावर असताना विनोद खन्ना यांनीही चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवून ओशोंच्या आश्रमात अनेक वर्षे घालवली होती.

रेव्ह पार्टीत झालेल्या अटकेपासून ते पूनम पांडेसोबतचे अफेअर, असे आहे साक्षीचे आयुष्य..
'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटात संजय लीला भन्साली यांचा सहायक दिग्दर्शक असलेल्या साक्षी खन्नाने इंडस्ट्रीतील लाइमलाइटपासून दूर राहून संन्यास घेतला आहे.  साक्षीच्या करिअरविषयी सांगायचे म्हणजे, त्याला संजय लीला भन्साळी लाँच करणार होते, पण काही कारणास्तव चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. काही काळापूर्वी साक्षीने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले होते.

पूनम पांडेसोबत अफेअरची होती चर्चा...
साक्षी खन्ना आणि मॉडेल पूनम पांडे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा मीडियात होती. दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटोदेखील समोर आले होते. इतकेच नाही तर 2011 मध्ये झालेल्या रेव्ह पार्टीत सहभागी झाल्यामुळे साक्षी खन्नाला पोलिसांनी अटकदेखील केली होती.

ओशोंमुळे प्रभावित झाले होते विनोद खन्ना 
साक्षीचे वडील विनोद खन्ना कुटुंबाला वेळ देण्यासाठी रविवारी काम करत नव्हते.  असे करणारे ते शशी कपूर यांच्यानंतरचे दुसरे अभिनेते होते. परंतु ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले होते.  विनोद खन्ना पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जात होते. इतकेच नव्हे तर ते त्यांच्या चित्रपटांचे शूटिंगदेखील पुण्यातच ठेवायचे. पुण्याच्या ओशो आश्रमात त्यांनी 31 डिसेंबर 1975 रोजी दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपटांपासून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यांना 'सेक्सी संन्यासी'सुध्दा म्हटले जाऊ लागले होते. विनोद खन्ना ओशोंच्या मागे अमेरिकेला निघून गेले होते आणि तेथे ओशोंसोबत त्यांनी 5 वर्षे घालवली होती. ओशोंच्या सानिध्यात आल्यानंतर विनोद खन्ना यांनी आपले शेकडो जोडी सुट, कपडे, बुट आणि इतर लग्झरी साहित्य लोकांमध्ये वाटून टाकले होते. आश्रमात ते केवळ भगवे किंवा मरुन कलरचे कपडे घालत होते.  मात्र अमेरिकेतील आश्रम बंद पडल्यानंतर ते भारतात परतले होते.  एका मुलाखतीत विनोद यांनी स्वतः अमेरिकेतील आश्रमात माळीपासून ते स्वीपरचे काम केल्याचे कबुल केले होते. एप्रिल 2017 मध्ये कॅन्सरमुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले.  

बातम्या आणखी आहेत...