आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज (11 ऑक्टोबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 77 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचा काम करण्याचा उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. आजही ते त्यांच्या कामात अतिशय व्यस्त असतात. पण 1982 मध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या अपघातातून ते मृत्युच्या दाढेतून परतले होते. 26 जुलै 1982 रोजी बिग बी 'कुली' चित्रपटाच्या सेटवर गंभीर जखमी झाले होते. 2 ऑगस्ट 1982 रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.
अमिताभ यांच्यासोबतच्या दुर्घटनेची स्मिता यांना आली होती पूर्वकल्पना...
'कुली' शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांसोबत एक मोठी दुर्घटना घडली. एका फायटिंग सीनमध्ये अभिनेता पुनीत इस्सरच्या एका ठोशामुळे अमिताभ यांच्या आतड्याला जबर मार बसला होता. त्यावेळी तर अमिताभ यांना त्यांना किती मार लागला आहे याची जाणीव झाली नाही. पण काही वेळाने जेव्हा अमिताभ यांच्या पोटात दुखायला लागले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ यांना त्यांच्या या अपघाताविषयी अगोदरच कोणीतरी कल्पना दिली होती ती व्यक्ती होती अभिनेत्री स्मिता पाटील.
फोन करुन अमिताभ यांना काय म्हटल्या होत्या स्मिता पाटील..
अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, कुली चित्रपटाचे शूटिंग बंगळुरूमध्ये सुरु होते. त्यादरम्यान एकदा रात्री 2 वाजता मला रिसेप्शनमधून फोन आला. त्यांनी सांगितले की, अभिनेत्री स्मिता पाटील यांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी चरकलो कारण मी कधीही स्मिताशी इतक्या रात्री बोललो नव्हतो. मी फोन घेतल्यावर मला समोरुन स्मिता यांनी विचारले, तुमची तब्येत ठिक आहे ना? यावर मी हो असे उत्तर दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्यासोबत अपघात घडला. अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी नमक हलाल, शक्ती आणि गुलामी या सिनेमात काम केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.