Home | News | late Girish Karnad had done the bachelors in Mathematics and Statistics, he use to write plays in Kannada language

स्वर्गीय गिरीश कर्नाड यांनी मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिक्समध्ये केले होते बॅचलर, कन्नड भाषेत लिहायचे नाटक, या आहेत त्यांच्या काही खास गोष्टी 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 12:58 PM IST

जाणून घेऊयात त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी 

 • late Girish Karnad had done the bachelors in Mathematics and Statistics, he use to write plays in Kannada language

  एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेते आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन झाले आहे. गिरीश कर्नाड 81 वर्षांचे होते. सांगितले जात आहे की, गिरीश कर्नाड मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. गिरीश कार्नाड प्रसिद्ध समकालीन लेखक, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार म्हणून ओळखले जायचे. गिरीश कर्नाड, सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटातही दिसले होते आणि 'मालगुड़ी डेज' च्या स्वामीच्या पित्याच्या रोलसाठीही त्यांना ओळखले जाते. गिरीश कर्नाड यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता पण पण त्यांनी लिहिण्यासाठी कन्नड़ भाषा निवडली आणि त्यांच्या नाटकांचे नंतर अनेक भाषांमध्ये अनुवाद केले गेले.

  गिरीश कर्नाड यांच्याविषयी काही खास गोष्टी....
  - महाराष्ट्रातील माथेरानमध्ये 19 मे 1938 ला त्यांचा जन्म झाला होता. गिरीश रघुनाथ कर्नाड हे त्यांचे पूर्ण नाव.
  - गिरीश कर्नाड यांनी कर्नाटक आर्ट्स कॉलेजमध्ये मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिक्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स केले होते.
  - ऑक्सफोर्डमधून मिळवली फिलॉसफी, पॉलिटिकल सायन्स आणि इकोनॉमिक्समध्ये मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री.
  -1974 ते 1975 पर्यंत फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे डायरेक्टर होते.
  - 1988 ते 1993 पर्यंत संगीत नाटक अकादमीचे चेअरमनपद सांभाळले.
  - गिरीश कर्नाड कन्नड़ भाषेमध्ये लिहायचे नाटक. 'तुगलक', 'ययाति' आणि 'हयवदन' ही होती त्यांची प्रमुख नाटके.
  - गिरीश कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री अवार्डने नावाजले गेले होते आणि 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित केले गेले.
  - गिरीश कर्नाड यांना 1994 मध्ये साहित्य अकादमी अवार्ड मिळाला होता.
  - साहित्य रचनेसाठी 1998 मध्ये गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला होता.
  - गिरीश कर्नाड यांनी 1971 मध्ये 'वंशवृक्ष' ने डॉरेक्शनमध्ये डेब्यू केला होता, एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड़ उपन्यासावर आधारित होता हा चित्रपट.

Trending