आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागच्यावर्षी शहीद झालेल्या मेजरच्या पत्नी नीतिका आर्मी जॉइन करणार, चेन्नई ओटीएमधून बोलावणे आले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

देहरादून : मागच्यावर्षी 18 फेब्रुवारीला एका सैन्य अभियानात शहीद झालेले मेजर विभूती ढौंडियालच्या पत्नी नीतिका कौल सेनेच्या टेक्नीकल विंगमध्ये सामील होणार आहे. त्यांनी आर्मीच्या एन्ट्रान्स एग्जाम (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) क्लीअर केले आहे. त्यांना चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकेडमी (ओटीए) मधून कॉल लेटरदेखील आले आहे. नीतिका आता नोएडामध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात. 

नीतिकाच्या कुटुंबातील सदस्यांनी मंगळवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनाच्या आर्मी जॉइन करण्याची माहिती दिली. पतीच्या मृत्यूनंतर शहीद झाल्यानंतर त्यांना आर्मीची परीक्षा देण्यासाठी वयाच्या मर्यादेत सूट दिली गेली होती. 

नीतिकाचा भावनिक व्हिडिओ झाला होता व्हायरल... 

मेजर विभूती शहीद झाल्यानंतर सोशल मीडियावर नीतिका यांचा आपल्या पतीला निरोप दिल्याचा एक भावनिक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.  नीतिका म्हणाली की, 'तुम्ही म्हणाला होतात, तुमचे माझ्यावर प्रेम आहे, पण तुमचे या देशावर जास्त प्रेम आहे. मी नेहमी तुमच्यावर प्रेम करत राहीन, माझे आयुष्य तुमच्यासाठी आहे.  

शहीद मेजरच्या आई म्हणाल्या, आम्ही खूप खुश आहोत... 

नीतिका यांच्या सासू सरोज ढौंडियाल यांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, त्यानं आपल्या सुनेने आर्मी जॉइन केल्यामुळे खूप खुश आहेत. त्या म्हणाल्या की, ती शूर मुलगी आहे आणि माझ्या मुलीप्रमाणे आमची काळजी घेते. ती आमच्या आयुष्यात असल्याचा आम्हाला आनंद आहे. तिने ऑफर लेटर आल्याची बातमी आधी मला सांगितली. 

18 फेब्रुवारीला आपल्या पतीच्या पहिल्या पुण्यतिथीला नीतिका म्हणाल्या होत्या की, मला अपेक्षा आहे की, मलाही देशाची सेवा करण्याची संधी मिळेल. नीतिका आणि विभूती कॉलेजमध्ये भेटले होते आणि एप्रिल 2018 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यानंतरच मेजर विभूती शहीद झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...