आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिरा गर्भधारणेने उद‌्भवतात या विविध आरोग्य समस्या, वेळीच सावध व्हा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या वेळेनुसार प्राधान्य, गरजा व संधी यात बदल होत आहे. त्यातच लग्न आणि मुलांऐवजी महिला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे अधिक वयात मुले जन्मास येत आहेत. 


वेळीच सावध व्हा : अस्थमा, मधुमेह, एसटीआय (युवा संक्रमित संक्रमण) सारख्या चिकित्सक स्थिती आणि स्थूलत्व गर्भधारणेला प्रभावित करू शकते. या प्रकारे गर्भधारणा होण्यापूर्वी आश्वासक राहिले पाहिजे. कोणताही धोका उद्भवणार नाही. फॉलिक अॅसिड घेण्यामुळेही गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. नियोजन करा की, चिकनपॉक्स, एनीमिया, रुबेला आदींचे संसर्ग होणार नाही. यासाठी नियामित तपासणी केली पाहिजे. याशिवाय गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांकडून जे मार्गदर्शन केले जाते, त्याचाही लाभ घेतला पाहिजे. 


वय : वयानुसार गर्भावस्था ही एक महत्त्वपूर्ण भूमिका असते. जास्त वय झाल्यास अंडी कमी होतात. जर उशिरा मातृत्व घेण्याची इच्छा होत असेल तर काही गोष्टींसाठी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण वेळेसोबत गर्भपात, उच्च रक्तचाप, प्री-एक्लेम्पिया, प्लेसेंटा बाधा, एक्टोपिक गर्भधारणा, मधुमेह, प्लेसेंटा, प्रसूती आदी आव्हाने उभी राहू शकतात. जास्त वयात गर्भधारणा झाल्यास मुलांना डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता वाढू शकते. 


एग फ्रीजिंग : यामध्ये गर्भधारणेसाठी शरीरात लागणारी अंडी सुरक्षितपणे ठेवली जाते. ज्यायोगे भविष्यात त्याचा वापर होऊ शकेल. जर अंडी गोठवून ठेवणे पसंत करत असाल तर एक विशेष काळजी घेतली पाहिजे. गर्भधारणेसाठी वय वर्ष २० ते ३० उत्तम समजले जाते आणि कमीत कमी २५ ते ३० अंडी गोठवूण ठेवले पाहिजे. 


एम्ब्र्यो फ्रीजिंग : उपयुक्त पद्धतीशिवाय दांपत्याची इच्छा असेल तर ते एम्ब्र्यो फ्रीजिंग करू शकतील, जिथे स्पर्म आणि एग्स यांना फर्टिलाइस केले जाते. 


आर्टिफिशियल इन्सेमिनेशन : या पद्धतीत प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणूचे निशेचन यशस्वी प्रक्रियेनंतर अंडी गर्भात टाकली जातात. 

 

फर्टिलिटी अँड आयव्हीएफतज्ज्ञ, नवी दिल्ली 
डॉ. प्रीती गुप्ता 

बातम्या आणखी आहेत...