आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Saeed Jaffrey Birthday : या ज्येष्ठ अभिनेत्याने भोळी बायको आणि 3 मुलांना सोडून केले होते एका विदेशी महिलेशी लग्न, पण 6 महिन्यातच झाला पश्चात्ताप, 7 वर्षानंतर बायकोविषयी एका मॅगझिनमध्ये जे वाचले ते वाचून झाले पुरते हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'गांधी’, ‘शतरंज के खिलाड़ी’ अशा फेमस चित्रपटांत काम केलेले आणि 'दिल्लगी' मध्ये अक्षय कुमारच्या वडीलांचा रोल प्ले करणारे बॉलिवूड अभिनेते  सईद जाफरी यांची आज (8 जानेवारी) 90 वी बर्थ अनिव्हर्सरी आहे. थिएटर, टीव्ही आणि ब्रिटिश चित्रपटांत आपली छाप सोडणाऱ्या जाफरी यांनी करियरची सुरुवात आकाशवाणी मधून केली आहे. त्यांनी जवळजवळ १०० हिंदी चित्रपटांत काम केले. पण 1977 मध्ये आलेला सत्यजीत रे यांचा ‘शतरंज के खिलाड़ी’ या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांनी अभिनेत्री आणि ट्रॅव्हल रायटर मेहरुन्निसा (मधुर जाफरी) यांच्याशी लग्न केले. 10 वर्षानंतर 1965 मध्ये हे लग्न मोडले. त्यांच्या तीन मुली मीरा, जिया आणि सकीना जाफरी आहेत. 1980 मध्ये सईद यांनी एका विदेशी कास्टिंग डायरेक्टर जेनिफर जाफरी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. पहिले लग्न लॉडल्यामुळे ते आयुष्यभर पस्तावत होते. सईद यांनी आपल्या डायरीमध्ये हे लिहिले आहे. 

 

सईद यांच्या भावना त्यांच्याच शब्दात...
- सईद यांनी डायरीमध्ये लिहिले होते, "मी 19 वर्षांचा होतो जेव्हा मेहरुन्निसासोबत माझे लग्न झाले. ती 17 वर्षांची होती. मी ब्रिटिश कल्चरवर फिदा होतो. न अडखळता इंग्रजी बोलणे, महागडे सूट घालण्याची मला सवय होती. मेहरुन्निसा ठीक याच्या उलट होती. आज्ञाकारी पत्नी, चांगली आई आणि चांगली होममेकर. पण तशी नाही, जशी मला हवी होती. माझे सल्लेही तिला बदलू शकले नाही. या प्रयत्नात आम्ही दुरावत गेलो आणि शेवटी वेगळे झालो"

 

- "यादरम्यानच मी जेनिफरला भेटलो आणि ती मला आवडू लागली. नंतर आम्ही लग्नदेखील केले. पण 6-7 महिन्यातच मला जाणवले की, जेनिफरला माझी काळजीच नाहीये. तिला तर केवळ तिचे स्वप्नच पूर्ण करायचे होते. आता मेहरुन्निसाची आपुलकी आठवू लागली. मी कधीच मेहरुन्निसा मुलांकडे वळूनही नाही पहिले. सात वर्षानंतर मी शेफ मधुर जाफरीबद्दल आर्टिकल वाचले"

 

- "मी त्या महिलेचा फोटो पाहून शॉक झालो होतो. ती मेहरुन्निसाच होती. तिने दुसरे लग्न केले होते आणि नावदेखील बदलले होते. आता ती अमेरिकेत होती.  मी तिला भेटायला आलो तर तिने नकार दिला. मुली तर केवळ एकदाच बोलण्यासाठी तयार झाल्या होत्या. मुली मला म्हणाल्या, नव्या वडीलांना माहित आहे की, खरे प्रेम कशाला म्हणतात. त्यांनी आईला बदलले नाही, जशी आहे, तसेच मान्य केले. याच ताकदीने आईला सेल्फ डिपेंडेंट बनवले"

 

- "तेव्हा मला जाणवले की, मोकळेपणामुळे त्यांचे लग्न टिकले. मात्र माझ्या स्वार्थाने तिच्या व्यक्तिमत्वाला दाबून ठेवले होते. त्यामुळेच नाते तुटले. खरे तर हे आहे की, केवळ स्वतःवर प्रेम केले आणि जे केवळ स्वतःवर प्रेम करतात ते इतरांवर प्रेम करू शकत नाहीत"

 

थिएटरने केली होती सुरुवात... 
- जाफरी यांनी आपल्या करियरची सुरुवात दिल्लीमध्ये थिएटरने केली होती. 1951 पासून 1956 पर्यंत 'ऑल इंडिया रेडियो' मध्ये पब्लिसिटी आणि एडवरटाइजिंग डायरेक्टर म्हणून काम केले. सईद पहिले भारतीय होते, ज्यांना 'आर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर' अवॉर्ड मिळाला होता. 

 

- 100 पेक्षाही जास्त चित्रपटांत काम करणाऱ्या जाफरी यांना 1978 मध्ये आलेला चित्रपट 'शतरंज के खिलाड़ी' साठी बेस्ट सपोर्टिंग एक्टरचा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला. 1988-89 मध्ये प्रसारित झालेली दूरदर्शनची हिट सीरीज 'तंदूरी नाइट्स' मध्येही त्यांनी काम केले. 

मात्र 15 नवंबर, 2015 ला सईद (86) यांचा लंडनमध्ये ब्रेन हेमरेजमुळे मृत्यू झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...