आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या दुसर्‍या पुण्यतिथीनिमित्त चेन्नईत झाली प्रार्थना सभा, जान्हवी म्हणाली - 'काश तुम्ही इथे असता'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - अभिनेत्री श्रीदेवी यांची 24 फेब्रुवारी रोजी दुसरी पुण्यतिथी होती. 2 वर्षांपूर्वी दुबईमध्ये त्यांचे निधन झाले होते. हिंदू कॅलेंडरनुसार त्यांचे वर्षश्राद्ध 4 मार्च रोजी होते. यानिमित्ताने बोनी कपूर कुटुंबासमवेत चेन्नईमध्ये पूजेचे आयोजन केले होते. बोनी यांनी त्यांच्या मायलापोरस्थित घरी प्रार्थना सभा घेतली. प्रार्थना सभेत भाग घेण्यासाठी जान्हवी कपूर खास करुन मुंबईहून चेन्नईला पोचली. जान्हवीने इंस्टाग्रामवर प्रार्थना सभेची काही छायाचित्रेदेखील शेअर केली आहेत, ज्यात तिने कॅप्शनमध्ये लिहिले - काश तुम्ही इथे असता. जान्हवीने यावेळी गोल्डन आणि गुलाबी साऊथ इंडियन ड्रेस परिधान केला होता.

24 फेब्रुवारीला काढली होती श्रीदेवीची आठवण 

जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रीदेवी यांची आठवण काढत एक छायाचित्र शेअर केले होते. या फोटोला तिने कॅप्शन  दिले होते - 'तुमची आठवण रोज येते'.

2018 मध्ये निधन

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले होते. दुबईमध्ये भाचा मोहित मारवाहच्या लग्नाला त्या गेल्या होत्या. तेथील हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. संशयास्पद परिस्थितीत झालेल्या त्यांच्या मृत्यूने सर्वांना धक्का पोहोचला होता.