आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या केलेल्या 'बालिका वधू'च्या Ex- बॉयफ्रेंडने केले लग्न, रजिस्टर्ड मॅरेजमध्ये सहभागी झाले कुटूंब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दिवंगत टीव्ही अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीचा Ex-बॉयफ्रेंड आणि अभिनेता राहुल राज सिंहने लग्न केले आहे. राहुलने आपली एक्स गर्लफ्रेंड आणि टीव्ही अॅक्ट्रेस सलोनी शर्मासोबत गुरुवारी सकाळी रजिस्टर्ड मॅरेज केले. या कपलच्या लग्नात फक्त कुटूंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. राहुलने स्वतः इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन लग्नाची माहिती दिली. गुरुवारी संध्याकाळी कपल मुंबईमध्ये फ्रेंड्ससाठी कॉकटेल पार्टी होस्ट करणार आहे. हा राहुल राज सिंह 2016 मध्ये प्रत्यूषाच्या आत्महत्येनंतर ढसाढसा रडताना दिसला होता. 

 

राहुलची जुनी बिझनेस पार्टनर आहे सलोनी...
- मेमध्ये राहुलने आपला वाढदिवस सलोनीसोबत सेलिब्रेट केला होता. यावेळी त्याने सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले होते. तेव्हा त्याने त्याच्या आणि सलोनीच्या नात्याची माहिती दिली होती.
- त्याने लिहिले होते की, "माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. परिस्थिती आपल्याला मारत नाही तर अजून स्ट्राँग बनवते असे म्हणतात. मला आज ज्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांचे आभार. मी माझ्या सलोनीचे विशेष आभार मानेल. ती लवकरच माझी पत्नी होणार आहे."
- सलोनी शर्मा, राहुलची जुनी बिझनेस पार्टनर आहे. प्रत्यूषाच्या आयुष्यात येण्यापुर्वी राहुलचे नाव संयुक्ता मुखर्जी नावाच्या मुलीसोबत लग्न केले होते असे बोलले जात होते. पण त्यांचा लवकरच घटस्फोट झाला होता.

 

प्रत्यूषाच्या मृत्यूनंतर सलोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे राहुल 
- प्रत्यूषाच्या मृत्यूनंतर राहुल दिर्घकाळ टीव्ही अभिनेत्री सलोनी शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये राहिला.
- दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्त मीडियामध्ये आले होते. या कपलने सोशल मीडियावर एकमेकांना बरेच काही सुनावले होते. यानंतर राहूल सलोनीपासून दूर झाला होता.
- यानंतर राहुल साउथ अॅक्ट्रेस सीता नारायणला डेट करत आहे असेही वृत्त आले होते. दोघं एकत्र पार्टीमध्ये स्पॉट झाले होते.

 

कोण आहे राहुल राज 
- राहुल राज अॅक्टर आहे. त्याने 'माता की चौकी', 'अम्बर धारा' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
- राहुल इवेंट मॅनेजमेंट आणि फिल्म प्रोडक्शन कंपनी 'युवा टायगर एन्टटेन्मेंट अँड मॅग्नस ओपन फिल्म्स'चा ओनर आहे.
- प्रत्यूषा आणि राहुल या दोघांची भेट जमशेदपुरमध्ये एका कॉमन फ्रेंडच्या लग्नता झाली होती. पहिल्या नजरेत हे एकमेकांच्या प्रेमात पडले. काही भेटीनंतर दोघांनी डेटिंग सुरु केली.
- प्रत्यूषा आणि राहुल बराच काळ गोरेगाव येथील 2 बेडरुम फ्लॅटमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. जोडीने सोनी टीव्हीचा शो 'पावर कपल'मध्ये सहभाग घेतला होता.
 

बातम्या आणखी आहेत...