आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi BJP Leader Joy Banerjee Caugh On Camera Distributing Money In Birbhum

पश्चिम बंगाल : भाजप नेते जॉय बॅनर्जी मतदारांना पैसे वाटताना कॅमेरात कैद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता / खंडवा - आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी घेऊन जाणा-या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करताना कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. भाजपचे वीरभूम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जॉय बॅनर्जी मतदारांना खुलेआम पैसे वाटताना एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
जॉय बॅनर्जींवर पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी, मी गरजवंताना आणि मशिदीत चादर चढविण्यासाठी पैसे दिले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसचे अरुण यादव देखील कॅमे-यात कैद
काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खंडवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अरुण यादव यांच्यावरही पैसे वाटल्याचा आरोप झाला होता. बुधवारी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातली आदिवासी बहुल भागाताली वृद्ध आणि युवकांसोबत होळी साजरी केली होती. या कार्यक्रमात यादव 100- 100 रुपयांच्या नोटा वाटताना कॅमेरात कैद झाले होते. या प्रकाराची तक्रार मिळाल्यानंतर खंडवाचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.