आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Latur Does Not Want MLAs Who Live In Mumbai For 28 Days A Month And Get Up At 3 Pm Manoharrao Gomare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिन्यातले २८ दिवस मुंबईत राहणारे, दुपारी २ वाजता उठणारे आमदार लातूरला नकोत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - अमित देशमुखांना लातूरच्या विकासाशी देणेघेणे नाही. गेल्या दहा वर्षांत त्यांनी लातूरची वाट लावली आहे. हे कमी म्हणून की काय, आता ते लहान भाऊ धीरजला लातूर ग्रामीणमधून आमदार करण्याच्या तयारीत आहेत. परंतु एकाच घरातील दोघे भाऊ कशासाठी, असा सवाल विचारत महिन्यातले अठ्ठावीस दिवस मुंबईत राहून लातूरची आमदारकी भूषवणारे आता नकोत, असा घणाघाती हल्ला ज्येष्ठ समाजवादी नेते मनोहरराव गोमारे यांनी केला. भाजपचा उमेदवारही दुपारी दोन वाजता झोपेतून उठणारा असल्याचे सांगत त्यांनी शैलेश लाहोटींवरही टीकास्त्र सोडले आहे.

लातूरमध्ये आपल्याला एकतर्फी वातावरण आहे असा अमित आणि धीरज या देशमुख बंधूंचा समज खोटा ठरवणारी घटना बुधवारी घडली. लातूरच्या सार्वजनिक जीवनामध्ये एक सच्चा, सचोटीचा आणि आंतरिक तळमळ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या मनोहरराव गोमारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन लातूर शहरमधील काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख, भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी, लातूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. दिवंगत केशवराव सोनवणे यांनी लातूरमध्ये उभ्या केलेल्या संस्था देशमुख कुटुंबीयांनी बुडवल्या. गेल्या चाळीस वर्षांत लातूरच्या विकासाच्या नावाखाली त्यांनी घरे भरण्याचेच काम केले आहे. हे कुटुंब लातूरच्या राजकारणात घराणेशाही आणि एकाधिकारशाही आणत आहे. लातूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघात एकाच घरातील दोघे भाऊ आमदार झाले तर सामान्यांचे हीत साधले जाणार नाही. केवळ आतापर्यंत गोळा केलेली माया सांभाळण्यासाठीच या दोघांना आमदारकी हवी आहे, अशा शब्दांत मनोहरराव गोमारे यांनी बोचरी टीका केली आहे. 
 

यांना झोपेतून उठायला दुपारचे दोन वाजतात
गोमारे यांनी भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्यावरही टीका केली.  हा उमेदवार झोपेतून उठायलाच दुपारचे दोन वाजवतो. तो लातूरचे काय भले करणार, असा सवाल विचारत त्यांनी दोन्ही उमेदवार कुचकामी असल्याचे सांगत वंचितला पाठिंबा जाहीर केला.
 

बातम्या आणखी आहेत...