आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात समाजकल्याण अधिकारी लाच घेताना अडकला जाळ्यात 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - अपंग शाळेतील कर्मचाऱ्याचे ४७ लाख३३ हजारांच्या थकीत वेतनाची रक्कम अदा करण्याच्या मोबदल्या नऊ लाखांची मागणी करून सात लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या लातूर येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे याला मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. एका खासगी व्यक्तीमार्फत त्याने लाच स्विकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी सांगितले. 


बेद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका अपंग शाळेतील कर्मचाऱ्यांच्या ४७ लाख ३३ हजार रुपये वेतनाची रक्कम थकीत होती. ती काढण्यासाठी हे अपंग शाळेतील कर्मचारी समाजकल्याण विभागात तक्रार करत होते. मात्र काम होत नव्हते. अखेर मिनगिरे याचा हस्तक अशी ओळख असलेल्या उमाकांत तपशाळे याने अपंग शाळेतील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तुमचे ४७ लाखांचे बिल काढायचे असेल तर २० टक्के प्रमाणे ९ लाख ४० हजारांची लाच द्यावी लागेल असे सांगितले. उमाकांत तपशाळे हा उदगीरच्या अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव आहे. त्यामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी सापळा रचला. मंगळवारी मिनगिरे याच्या कक्षात तपशाळे याने ७ लाख रुपये देऊन उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे ठरवले. यावेळी मिनगिरे तेथेच खुर्चीवर बसून होते. त्यांनी याला संमती देऊन पैसे तपशाळे याच्याकडे देण्यास सूचवले आणि लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तत्काळ छापा टाकला. 


असा अडकला जाळ्यात 
संजय क्वालिटी हाॅटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी शाळेतील कर्मचाऱ्यांनी उमाकांत तपशाळे याच्याकडे पैसे दिले. त्याचवेळी तेथे सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपशाळे याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर समाजकल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यालाही ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा साडे दहा वाजता कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...