social / लातूरकरांनी २८ हजार गणेशमूर्ती विसर्जित न करता केल्या दान

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सर्वांनीच दिला प्रतिसाद

Sep 14,2019 07:22:00 AM IST

लातूर : शहर व जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाअभावी सध्या भीषण पाणीटंचाई आहे. इतकी की गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाचीही अडचण होती. यावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूरकरांना या मूर्ती महापालिका, मूर्तिकार, स्वयंसेवी संस्थांना दान करण्याचे आवाहन केले. याला नागरिक व गणेश मंडळांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आणि पाहता पाहता २८ हजार मूर्ती महापालिकेकडे जमा झाल्या.


मूर्तिकारांनाच केले या मूर्ती घेऊन जाण्याचे जाहीर आवाहन


अनेकांनी घरीच ठेवल्या...
शहरासाठी अत्यल्प पाणी उपलब्ध आहे. तेही प्रदूषित होऊ नये म्हणून अनेकांनी यंदा घरीच मूर्ती ठेवल्या आहेत.
पाच ठिकाणी संकलित झालेल्या या मूर्ती घेऊन जाण्याचे आवाहन मूर्तिकारांना करण्यात आले आहे.
मूर्ती घेऊन जाणाऱ्यांकडून तिचे विटंबन होऊ देणार नाही अशी लेखी हमी घेतली जाते.
पावसाअभावी जलस्रोत कोरडे असल्याने उपक्रम

राज्यात विसर्जनावेळी १८ जणांचा मृत्यू...
अमरावतीत ३, रत्नागिरी २, नाशिक, सिंधुदुर्ग, सातारा येथे प्रत्येकी २ तसेच नांदेड, ठाणे, बुलडाणा, अकोला, भंडारा येथे प्रत्येकी एक जण मरण पावला.
X