आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएसअार निधीतील देशातल्या पहिल्या हरित मार्गाचे लाेकार्पण; १५ हजार झाडांची लागवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबई-अाग्रा महामार्गावरील गाेंदे ते पिंपळगाव बसवंत या ६० किलाेमीटर अंतराच्या हरित महामार्गाचे लाेकार्पण बुधवारी (दि. २४) केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात अाले. सीएसअार निधीमधून झालेला देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच हरित महामार्ग असून येस बंॅकेच्या सीएसअार निधीतून ताे साकारला अाहे. नाशिक परिसरातील उद्याेग अाणि काॅर्पाेरेट कंपन्यांनी पुढे येत पाच-पाच किलाेमीटरची जबाबदारी घेऊन महामार्ग पूर्णपणे हरित करावा, असे अावाहनही गडकरी यांनी यावेळी केले. 

 

हरित पथ प्रायव्हेट लिमिटेडने साकारलेला हरित महामार्ग हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, जल अाणि वायू प्रदूषण या अाज देशासमाेरीलच नव्हे तर जगासमाेरील समस्या अाहेत. देशभरात महामार्गांची उभारणी, रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू अाहेत. ही कामे करताना अनेक ठिकाणी वृक्षताेडही हाेत असते. त्यामुळे एक झाड ताेडले तर कमीत कमी दहा झाडे अापण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच दृष्टीने देशात अाज अनेक ठिकाणी काॅर्पाेरेट‌्स, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था यांना साेबत घेऊन त्यांच्या माध्यमातून हरित महामार्ग साकारण्याचे काम सुरू अाहे. यामुळे वायू प्रदूषणाला अाळा बसू शकणार असल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. 

 

कार्यक्रमाला निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, सेक्रेटरी तुषार चव्हाण, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, सुरेश पटेल, भरत पटेल, लघु उद्याेग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, श्रीपाद कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, अशाेक राजवाडे, मनीष रावल यांच्यासह माेठ्या संख्येने उद्याेजक व भाजपचे पदाधिकारी उपस्थित हाेते. 

 

असा अाहे हरित महामार्ग प्रकल्प 
गाेंदे ते पिंपळगाव बसवंतदरम्यान शहरातील २० किलाेमिटरचे अंतर वगळून महामार्गाच्या दुतर्फा ११,७९० तसेच मध्यभागी २,७६९ झाडांची लागवड करण्यात अाली अाहे. त्यांचे पाच वर्षांपर्यंत संगाेपन केले जाणार अाहे. महामार्गाच्या कडेला तीन रांगांमध्ये अनुक्रमे शाेभेची, सावली देणारी अाणि सावलीसह फळे देणारी झाडे लावण्यात अाली अाहेत. वड, अांबा, कडुलिंब, पिंपळ, चिंच यांसारख्या झाडांचा त्यात समावेश असल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले. 


'पुण्यकर्माचा हिशेब हाेताेच; तेव्हा रुग्णसेवेला व्यवसायाचे रूप देऊ नका' 
अांतरराष्ट्रीय दर्जाची रुग्णसेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा अशाेका ग्रुपच प्रयत्न खराेखरच स्तुत्य असून या हाॅस्पिटलकडे व्यवसाय म्हणून न बघता समाजातील शाेषित, पीडित, गरीब असा कुठलाही घटक रुग्णालयात उपचारासाठी अाल्यास पैशांअभावी वंचित राहू नये, याची दक्षता घ्या. इतर संस्थांनीही रुग्णसेवेला कधीही व्यवसायिक स्वरूप देऊ नये, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

 

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे बुधवारी (दि. २४) केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते उद‌्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, आचार्य चंदनाजी म. सा., महापाैर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अशाेका ग्रुपचे अध्यक्ष अशाेक कटारिया, अामदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, अनिल कदम, किशाेर दराडे, नरेंद्र दराडे, कल्याणचे अामदार नरेंद्र पवार अादी उपस्थित हाेते. गडकरी म्हणाले की, राज्यात पहिल्यांदा बीअाेटी तत्त्वावरचे रस्ते, पुलांचे काम सुरू करताना एका तरुण व्यावसायिक असलेल्या कटारिया यांनी अापल्यावर विश्वास ठेवला अाणि अाज बघता बघता १० ते १५ हजार काेटींचा रस्ते बांधकामाचा व्यवसाय उभा केला अाहे. त्यांनी अाता वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केल्याने अद्ययावत असे रुग्णालय उभारले. यातूनही गरीब रुग्णांना माेफत व इतरांना माफक दरात ते दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देतील असा विश्वास व्यक्त केला. गडकरी यांनी मी अाणि पालकमंत्री महाजन यांच्या राजकीय यशस्विततेमागे केवळ रुग्णसेवाच असल्याचे सांगितले. रुग्णसेवेचे महत्त्व पटवून देताना गडकरी यांनी २००४ मध्ये विराेधी पक्षनेता असताना झालेल्या अपघाताची अाठवण करून दिली. गाडीचा चक्काचूर झालेला असताना ते बघून काेणीही वाचले नसेल, असे वाटत हाेते. परंतू माझ्यासह कुटुंबीय सहीसलामत बचावले. मला प्रत्येकाने विचारले असा चमत्कार कसा? त्या दिवसापासून मी सांगताे, यापूर्वी अाठ वर्षात जे काही शेकडाे गरीब रुग्णांना माेफत मुंबई, पुण्यात हृदयविकार असाे की कृत्रिम अवयव बसविण्याच्या कामाचे पुण्य लाभल्यानेच जीवदान मिळाले. सेवा ही सेवेसारखीच असावी, व्यवसायात राजकारण अाणि राजकारणात व्यवसाय अाणू नये. जात, धर्म, पंथ न बघता रुग्णसेवा झाली पाहिजे.रावल यांनी रुग्णसेवेबरोबरच नागरिकांनी आजारीच पडू नये यासाठी अशोका ग्रुपच्या माध्यमातून वेलनेस सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करावे. त्यास पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून सर्वताेपरी मदत करणार अाहाेत, असे सांगितले. डाॅ. संचेती म्हणाले की, जगभरातील ३१ देशातील १५० हून अधिक रुग्णालये बघितली असता त्यांच्यापेक्षा अधिक सुविधा अशोका मेडिकव्हरमध्ये उपलब्ध अाहेत, यातील ऑपरेशन थिएटर दर्जेदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 


अशाेका मेडिकव्हरच्या उद‌्घाटनप्रसंगी केंद्रीय परिवहन व दळणवळणमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पद्मविभूषण डॉ. कांतिलाल संचेती, आचार्य चंदनाजी म. सा., महापाैर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अशाेका ग्रुपचे अध्यक्ष अशाेक कटारिया, अामदार सीमा हिरे अादींसह मान्यवर. 

 

कवितेतून गडकरींनी टाेचले स्थानिक भाजपेयींचे कान 
घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती.., इथे असावा प्रेम जिव्हाळा... नको नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकाेच नुसती वाणी सुर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी... ही काव्यपंक्ती सादर करीत गडकरींनी स्थानिक भाजपेयींना सामंज्यस्याचे बाेल सुनावले. त्यांचा राेख मात्र पालकमंत्र्यांसह शहराध्यक्ष अाणि अामदारांच्या दिशेने असल्याचे लपून राहिले नाही. या काव्यपंक्तीमागे पार्श्वभूमी अशी हाेती की, 'बाळासाहेब सानप, विजय साने यांच्यासाेबत येत असताना पालकमंत्री महाजन यांनी नवीन पक्ष कार्यालयाच्या बांधणीबाबत चर्चा केली असताना मी त्यांना म्हटलाे की चार भिंतंी उभारून त्यावर माेजॅक, टाइल्सवर किती माेठा खर्च हेईल, त्यापेक्षा अापसातील संवाद महत्त्वाचा अाहे.' 

 

मूकबधिर मुलांना घेतले दत्तक; त्यंाच्यावर सर्वप्रकारचे उपचार केले जातात मोफत 
महागड्या उपचारामुळे गरीब रुग्णांची मोठी अडचण होते. याचसाठी मुख्यमंत्री सहायता निधी, सीएसआर फंड, देवस्थानच्या माध्यमातून रुग्णांना उपचारासाठी अर्थिक मदत मिळवून दिली आहे. आतापर्यंत ३.५० लाखांपेक्षा अधिक रुग्णांना मदत मिळवून देताना राज्यातील १२ वर्षांच्या आतील सर्व मूकबधिर मुलांना दत्तक घेतले अाहे. त्यांच्यावर सर्वप्रकारचे मोफत उपचार केले जात असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. 

 

गरिबांना माेफत उपचार 
उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारपद्धती माफक स्वरूपात मिळावी, यासाठी हॉस्पिटलची उभारणी केली. यात ५९ बेड गरीबांसाठी राखीव अाहेत. त्या रुग्णांवर मोफत उपचार करणार असल्याची ग्वाही अशोका बिल्डकॉनचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी दिली. मेडिकव्हर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा यांनी रुग्णालयातील सेवांबाबत माहिती दिली. 

 

के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे कर्मयोगी व कृषी तपस्वी पुरस्कार प्रदान 
शिक्षण विकासाची किल्ली असून शिक्षणाचे व्यावसायिकीकरण आणि तांत्रिकीकरण झाले पाहिजे. संशोधन व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची देशाला गरज आहे. देशाचे इंजिन पुढे नेण्यासाठी शिक्षणसंस्थांनी दोष कमी करत गुणवत्तेला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मार्ग परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. 

 

के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कर्मयोगी व कृषी तपस्वी या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी गडकरी म्हणाले की, गरीबी व भूकबळी ही मोठी समस्या असून सर्वांच्या सहकार्यातूनच प्रश्न सुटू शकतील. देशात आज अाठ लाख डॉक्टरांची गरज आहे. वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात अजून काम करावे लागणार आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल तयार करावे. अाठ लाख कोटी रुपये इंधनाच्या माध्यमातून बाहेर जातात. इथेनॉलच्या वापरामुळे दोन लाख कोटी वाचू शकतील. तसेच त्यातून ५० लाख लोकांना रोजगारही मिळेल. आदिवासींना जंगलात इथेनॉलची निर्मिती होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घेता येईल. निफाड येथील ड्रायपोर्ट लवकरच सुरू होणार असून त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. नाशिकच्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने यावेळी के. के. वाघ संस्थेतर्फे गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. 

 

याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, जि प. अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार सीमा हिरे, राहुल आहेर, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, नरेंद्र दराडे व किशोर दराडे, मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार, संस्थेचे चांगदेवराव होळकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते. अजिंक्य वाघ, प्रा. डॉ. केशव नांदूरकर, प्रा. प्रकाश कडवे, प्रा. विलास आैरंगाबादकर, उद्योजक सुधीर मुतालिक, माणिकराव कोकाटे, सुरेशबाबा पाटील, अशोक मर्चंट, के. एस. बंदी, संजय होळकर उपस्थित होते. 

 

विद्या फडके व शेखर गायकवाड यांना पुरस्कार 
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना के. के. वाघ संस्थेतर्फे कर्मयोगी व कृषी तपस्वी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिकच्या घरकुल परिवारच्या विद्याताई फडके यांना कर्मयोगी तर कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांना कृषी तपस्वी पुरस्कारांचे गडकरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप अाहे. विद्याताई फडके यांनी मानसिक अपंगत्व आलेल्या मुलींसाठी मोठे काम उभारले आहे. तर शेखर गायकवाड यांनी कृषी क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. नदी संवर्धनातही त्यांचे योगदान आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...