आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Launch Of RISAT 2BR1 Through PSLV C48 From Satish Dhawan Space Center Along With 9n Other Satellite

5 देशांचे 10 उपग्रह लॉन्च; यात भारताच्या रीसॅट-2बीआर1चा समावेश, चकमकी-घुसखोरी दरम्यान सैन्यासाठी ठरेल उपयुक्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीहरिकोटामधून पीएसएलवी-सी48 रॉकेटमधून दुपारी 3:25 वाजता प्रक्षेपण झाले

श्रीहरिकोटा - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी दुपारी 3.25 वाजता भारतीय उपग्रह रीसॅट-2बीआर1 आणि इतर चार देशांचे 9 उपग्रह लॉन्च केले. हे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून पीएसएलव्ही-सी48 रॉकेटच्या मदतीने करण्यात आले. रीसॅट-2बीआर1 रडार इमेजिंग पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह ढगाळ वातावरण आणि अंधारातही स्पष्ट फोटो घेऊ शकतो. पृथ्वी इमेजिंग कॅमेरे आणि रडार तंत्रज्ञानाद्वारे हा उपग्रह चकमकी-घुसखोरीच्या वेळी सैन्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

35 सेमी दूरवर असलेल्या दोन वस्तुंना ओळखेल 

रीसॅट-2बीआर1 पाच वर्षे काम करेल. यामुळे रडार इमेजिंगचे तंत्र अधिक चांगले होणार आहे. यात 0.35 मीटर रिझोल्यूशनचा कॅमरा आहे, म्हणजेच हे 35 सेंटीमीटर दूरवरील दोन वस्तुंना ओळखू शकतो. या सॅटेलाइटमुळे सीमेवरील दहशतवादी हालचालींवर चोख लक्ष ठेवण्यास मदत मिळेल. यामुळे देशातील तिन्ही लष्कर आणि सुरक्षा दलाला मदत होईल. याचे वजन 628 किलोग्राम आहे. याला प्रक्षेपणाच्या 17 व्या मिनीटात जमिनीपासून 578 किलोमीटर उंच पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले जाईल.

सुरक्षा एजंसीला 4 रीसॅटची गरज

इस्रो रीसॅट सीरीजमधील पुढील उपग्रह रीसॅट-2बीआर2 ची लॉन्चिंगदेखील याच महिन्यात
करणार आहे. त्यानंतर एजून एक सॅटेलाइट लॉन्च केले जाईल. परंतू, त्या लॉन्चिंगची तारीख अद्याप स्पष्ट नाहीये. सुरक्षा एजंसीला एक दिवसात अनेक ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी चार रिसॅटची आवश्यकता आहे. एखादे एनकाउंटर किंवा घुसखोरीच्या वेळी या चारही सॅटेलाइट उपयोगी ठरतील. 6 मार्चपर्यंत इस्रोचे 13 मिशन लाइनमध्ये आहेत. यात 6 मोठे व्हीकलचे, तर 7 सॅटेलाइट मिशन आहेत.

इतर 9 सॅटेलाइटपैकी 3 नॅनो

देश         सॅटेलाइट
अमेरीका6
जापान1 (नॅनो)
इटली1 (नॅनो)
इज्राइल1 (नॅनो)

इज्राइली सॅटेलाइट हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी बनवले

लॉन्च केले जाणाऱ्या सॅटेलाइटपैकी इज्राइली उपग्रहाचे नाव दुचीफात-3 आहे. या उपग्रहाला
इज्राइलच्या हर्जलिया विज्ञान केंद्र आणि शार हनेगेव हायस्‍कूलच्या 2 विद्यार्थ्यांनी बनवले आहे. हे फक्त 2.3 किलोग्रामचे आहे. हे एक एजुकेशनल सॅटेलाइट आहे. यावर लावलेला  कॅमरा अर्थ इमेजिंगसाठी उपयोगात येणार आहे, तर रेडियो ट्रांसपोंडर वायू आणि जल प्रदूषणावर शोध करणे आणि जंगलांवर लक्ष ठेवण्याचे काम करेल. याला बनवणारे तिन्ही इज्रायली विद्यार्थी प्रक्षेपणावेळी राकेश धवन केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.

पीएसएलवीचे 50वे मिशन

पीएसएलवी रॉकेटची हे 50वी लॉन्चिंग आहे. श्रीहरिकोटावरुन प्रक्षेपित केले जाणारे 75वे रॉकेट असेल. सतीश धवन अंतराळ केंद्रातील फर्स्ट लॉन्च पॅडवरुन केले जाणारे हे 37 वे प्रक्षेपण असेल.