आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘किया’च्या एसयूव्ही सेल्टोसची लाँचिंग, किंमत १० ते १६ लाख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगाव - दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी किया मोटर्सने त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची जागतिक लाँचिंग गुरुवारी भारतात केली. ही कार कियाच्या एसपी कॉन्सेप्टवर आधारित असून ही २०१८ मधील वाहन प्रदर्शनात दाखवण्यात आली होती. देशात पुढील दोन वर्षांत चार नवीन मॉडेल सादर करण्याची कंपनीची योजना आहे. सेल्टोसला भारतीय बाजाराच्या दृष्टीने विचार करून तयार करण्यात आले आहे. ही गाडी कंपनीच्या आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथील प्रकल्पात तयार करण्यात येणार आहे. येथूनच कंपनी मध्य-पूर्व, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि इतर आशियाई देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष तसेच सीईओ हान-वू पार्क यांनी सांगितले की, किया मोटर्सची भारतासाठी तयार करण्यात आलेल्या भूमिकेचा जगभरासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. कंपनी भारतीय बाजारात स्थान निर्माण करण्यासाठी एनर्जी आणि रिसोर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. कंपनीला भविष्यात मिळणाऱ्या यशामध्ये भारताचे महत्त्वाचे योगदान राहील. त्यांनी सांगितले की, “कंपनी अनंतपूर प्रकल्पात दोन वर्षांत सेल्टोससह चार नवीन मॉडेल बनवणार आहे.’ 

 

या आधी तीन वर्षांत सहा मॉडेल सादर करणार असल्याचे कियाच्या वतीने सांगण्यात आले होते. यामध्ये विशेष करून भारतासाठी तयार करण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनाचाही समावेश आहे. तरी कॉम्पॅक्ट श्रेणीमध्ये उतरण्याचा कंपनीचा विचार नाही.

बातम्या आणखी आहेत...