Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Lava appears from land in Beed

बीडमध्ये जमिनीतून लाव्हा सदृष्य पदार्थ बाहेर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 04:04 PM IST

सिरसाळ्यातील घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • Lava appears from land in Beed

    बीड- बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील मोकळ्या मैदानत जमिनीतून लाव्हा सदृष्य पदार्थ बाहेर येत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा लाव्हा बाहेर येताणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    या बाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, हा सगळा प्रकार वीजेच्या तारा पडल्याने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी पश्चम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, यावेळी वीजेची तार पडली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान लाव्हा येत असल्याची बातमी पसरताच लाव्हा पाहण्यासाठी लांबून लोक येत आहेत.

Trending