• Home
  • Tech auto
  • Tech
  • Lava Pay : Lava launches a payment app for feature phones, Does Not Require an Internet Connection for payment

'लावा'ने फीचर फोनसाठी लॉन्च केले पेमेंट अॅप, इंटरनेट कनेक्शनशिवाय करता येते ट्रांजेक्शन

  • इंटरनेटशिवाय कनेक्टिव्हिटीचे काम करणारे पहिलेच डिजिटल पेमेंट

दिव्य मराठी वेब टीम

Mar 16,2020 09:29:00 PM IST

गॅजेट डेस्क - भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने नवीन डिजिटल पेमेंट अॅप लावा-पे लॉन्च केले आहे. विशेषतः फीचर फोनसाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. कंपनीच्या मते, लावा-पे चालवण्यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. कंपनीने दावा केला आहे की, लावा-पे हाय सिक्योरिटी स्टैंडर्ड्सने युक्त आहे, याद्वारे फीचर फोन वापरकर्ते सुद्धा सहजरित्या डिजिटल ट्रांजेक्शन करू शकतील. लावा-पे अॅप सर्व फीचर फोनमध्ये प्री-लोडेड मिळेल मात्र जुन्या ग्राहकांना सर्व्हिस सेंटरवर जाऊन आपल्या फीचर फोनमध्ये अॅप इन्टाल करावे लागेल. या अॅपमध्ये पर्सन-टू-पर्सन पेमेंट करण्याची सुविधा मिळेल.


यूपीआय आयडी असेल गरज

अॅपद्वारे फंड ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकाकडे रिसीव्हरचा मोबाइल नंबर अॅपमध्ये टाकावा लागेल. त्यानंतर फंड रिसीव्हरच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाईल. अॅप ट्रांजेक्शन पास कोडद्वारे पेमेंट झाल्याची पुष्टी करेल. मात्र हे अॅप वापरण्यासाठी युझरला यूपीआय आयडीची आवश्यकता असेल. विना इंटरनेटद्वारे यूपीआय अकाउंट कसे तयार होईल असा प्रश्न कंपनीला विचारला असता, कंपनीने सांगितले की, युझरला बँकेतून यूपीआय आयडी तयार करावी लागेल, त्याद्वारे हे अॅप काम करेल.


इंटरनेटशिवाय करेल काम

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर रिसीव्हर आणि सेंडर दोघांच्या फोनवर पेमेंट कन्फर्मेशनचा मेसेज येईल. लावाचे हेड ऑफ प्रोडक्ट तेजिंदर सिंग यांनी सांगितले की, विना इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे काम करणारे हे पहिलेच डिजिटल पेमेंट आहे. यूझरला या अॅपच्या मदतीने आपले अकाउंट बॅलेन्स देखील तपासता येईल.


यूपीआयद्वारे आतापर्यंत झाले एकूण 2.2 लाख कोटींचे ट्रांजेक्शन

सिंग यांनी सांगितले की, कंपनीचे लक्ष्य त्या 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे आहे जे आजही इंटरनेटचा वापर करत नाहीत आणि बँकिंगसाठी ऑफलाइनचा वापर करतात. यावेली भारतात डिजिटल पेमेंटचा वापर वाढत जात आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, यूपीआयद्वारे फेब्रुवारी 2020 मध्ये 132.32 कोटी रुपयांचे ट्रांजेक्शन झाले आहे. तर आतापर्यंत यूपीआयद्वारे एकूण 2.2 लाख कोटी रुयपांचे ट्रांजेक्शन झाले आहे.

X