आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lawyer Nikhilesh Pande File PIL Agianest MNS & Raj Thackeray

मनसेची मान्यता रद्द करा, निवडणूक लढविण्यास बंदी घाला- सुप्रीम कोर्टात याचिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज ठाकरे हे प्रक्षोभक भाषणे करतात त्यामुळे हिंसक कृत्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची म्हणजेच मनसेची मान्यता रद्द करावी. तसेच मनसेला निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी (17 फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे.
दिल्लीतील स्थानिक वकील निखिलेश पांडे यांनी ही याचिका दाखल केली. निखिलेश पांडे यांचा मनसेशी काहीही संबंध नाही. तसेच मनसेने महाराष्ट्राबाहेरही आपले लक्ष घातले नाही. त्यामुळे ज्या राज्याचे ते रहिवाशी नाहीत नाहीत त्या राज्यातील घडामोडींवरून एखाद्याला याचिका दाखल करता येते का मुद्दा यानिमित्ताने उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेने आपली प्रतिक्रिया देताना आमच्या राजकीय हितशत्रूंमुळे पांडेंनी हा उद्योग केला असावा, असे म्हटले आहे. राज ठाकरेंनी यापूर्वी उत्तर भारतीयांविरोधात मोहिम उघडली होती. त्याचा संदर्भ घेऊनच ही याचिका दाखल केली असण्याची शक्यता आहे. मात्र, याचिकेतील विस्तृत मजकूर अद्याप समजलेला नाही.
राज ठाकरेंनी काल रात्रीच पुण्यात राज्यातील टोल वसुलीतील भ्रष्टाचारावर भाष्य करताना धुमाकूळ घातला. त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य करताना जोपर्यंत टोल वसुलीत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरू नका, असे आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केले होते. तसेच येत्या 12 फेब्रुवारीला मनसे रास्ता रोको करणार असून त्याचे स्वत: आपण नेतृत्त्व करणार असल्याचे म्हटले आहे.