आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laxman Kurhekara Article About Mendicant, Divya Marathi

भिकार्‍यांचा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्यूटी आटोपली की मी रेल्वेस्टेशन परिसरात ये-जा करत असतो. एक दिवस फुरसत काढून एका भिकार्‍याची दिनचर्या (त्याच्या नकळत) पाहिली अन् थक्क झालो. ते भिकारी जोडपे घाईघाईत गरमागरम पोळ्या व भाजी एका डब्यात भरताना पाहिले. माझी उत्कंठा वाढली. मी तेथेच थांबलो. पुढे ते सायंकाळी सातच्या मेलने अमरावतीला निघून गेले. जवळच्या दुकानदाराकडे त्या जोडप्याविषयी चौकशी केली असता बरीच माहिती मिळाली. चांगल्या प्रतीचा तांदूळ, गहू, डाळ व किराणा ते नियमित घेतात. ते आमचे नगदीचे व नियमित ग्राहक आहे. त्यांचे राहणीमान पाहून त्यांना भिकारी या शब्दाने का संबोधावे, हा मलाच प्रश्न पडला. त्यांचे जीवनमान पाहून कोणीही चाट पडावे. एकदा तर एकमेकांचा आधार घेऊन भीक मागताना त्यांना गाडीत पाहिले आणि चाट पडलो. कारण दीनवाणा चेहरा करून भीक मागत होते. नागपूरला त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे फिरताना पाहिले तेव्हा हे तेच का, या विचाराने गरगरायला झाले. मलिन कपडे व एखादा फंडा हेच त्यांचे भांडवल असते. प्रसंगी दीन व हतबल दिसणारा भिकारी पॉश व ऐटीत पाहायचा असेल, तर थोडी सवड काढून आपणही पाहू शकता. त्यासाठी वेळ काढावा लागेल. अगदी श्रीमंताला लाजवेल असे जेवण करून आम्ही दोन दिवसांचे भुकेले आहोत, असा अभिनय करणे सोपे नाही. त्यासाठी लाज सोडण्याची व खोटे बोलण्याची सवय हवी. भिकारी या व्यक्तीकडे बहुतांश लोकांचा पाहण्याचा कल म्हणजे दीनदुबळा, गरीब, लाचार किंवा हतबल असाच असतो. त्यामुळे सहानुभूतीचे शब्द वापरण्यापूर्वी त्यांची वास्तविक स्थिती लक्षात घेणेही आवश्यक असते. पोटासाठी माणूस काय काय करतो, याचेच दर्शन या लोकांच्या वागण्यातून होते.