आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Laxman Savadi Selected As Deputy Cm Who Was Caught Watching Porn In The Constitution

विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या नेत्याला भाजपने दिले उपमुख्यमंत्री पद; पक्षातील आमदाराने विचारला सवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - एका आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर कर्नाटकात मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात तीन उपमुख्यमंत्री आहेत. तीन उपमुख्यमंत्र्यांमध्ये विधानसभेत पॉर्न पाहताना आढळून आलेल्या भाजप नेत्याचा समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण सावदी असे या भाजप नेत्याचे नाव आहे. ते एकदा राज्य विधानसभेत पॉर्न पाहताना दिसले होते. 

लक्ष्मण सावदी यांना नवीन मंत्रिमंडळात ट्रान्सपोर्ट पोर्टफोलियो देखील देण्यात आला आहे. भाजप आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे सहयोगी एम.पी. रेणुकाचार्य यांनी लक्ष्मण यांच्या नियुक्तीचा विरोध केला आहे. लक्ष्मण यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळात सहभागी करून घेण्याची आवश्यकता का होती? असा सवाल रेणुकाचार्य यांनी विचारला. लक्ष्मण सावदी मागील वर्षीच्या निवडणुकीत महेश कुमाटटल्ली मतदारसंघातून पराभूत झाले होते.

वरिष्टांचा माझ्यावर विश्वास -  सावद
मी पदाची मागणी केली नव्हती. केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. यामुळे मी ती स्वीकारत आहे. मी पक्षाला आणखी मजबूत करणार असून आमचे सरकार चांगले नाव करेल असे लक्ष्मण सावदी यांनी एएनआयशी बोलतांना सांगितले. 

2012 मध्ये विधानसभेत पॉर्न पाहताना दिसले होते  
लक्ष्मण सावदी 2012 मध्ये दोघांसोबत विधानसभेत पॉर्न पाहताना दिसून आले होते. यामुळे भाजप पक्षात बरीच किरकिरी झाली होती. त्यावेळी मी शैक्षणिक हेतूसाठी व्हिडिओ पाहत असल्याचे सावदी यांनी सांगितले होते. यानंतर सावदी, सीसी पाटील आणि कृष्णा पालेमर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिली होता. 
 

बातम्या आणखी आहेत...