अॅसिड अटॅक / सच्चा प्रेमाचे उदाहरण बनलेले लक्ष्मी अग्रवाल आणि आलोक दीक्षित आता एकत्र राहत नाहीत, जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी

  • लक्ष्मीला गायिका व्हायचे होते मात्र त्या दिवसापासून तिचे आयुष्यच बदलले
  • एका कॅम्पेनमध्ये झाली होती आलोक आणि लक्ष्मीची ओळख
  • लक्ष्मी आणि आलोक यांना एक मुलगी सुद्धा आहे

दिव्य मराठी वेब टीम

Jan 13,2020 03:45:00 PM IST

नवी दिल्ली - अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित चित्रपट 'छपाक' 10 जानेवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. दीपिकाचा हा चित्रपट अॅसिड सर्वाइव्हर लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी लक्ष्मी अग्रवाल दीपिका आणि विक्रांत मॅसी सोबत दिसली होती. लक्ष्मीची गोष्ठ जवळपास सर्वांनाच माहिती आहे. परंतु ज्यांना माहित नाही त्यांना छपाक पाहिल्यांनतर माहिती होईल. परंतु तुम्हाला एक बाब माहिती आहे का, लक्ष्मी अग्रवालचा प्रियकर आलोक दीक्षित आज तिच्यासोबत नाही. दोघांमधील नाते संपले आहे. आलोक दीक्षित आणि लक्ष्मी अग्रवाल यांची एक मुलगी देखील आहे.

लग्नास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीने लक्ष्मीवर केला अॅसिड हल्ला


मध्यमवर्गीय कुटुंबातील लक्ष्मीचा जन्मा 1 जून 1990 रोजी झाला होता. लक्ष्मी लहानपणापासून गायिका होण्याची इच्छा होती. मात्र वयाच्या 15 व्या वर्षी तिचे संपूर्ण आयुष्यच पालटले. एका 32 वर्षीय युवकाची नजर लक्ष्मीवर पडली. त्याने तिला लग्नाची इच्छा बोलून दाखवली. परंतु लक्ष्मीने त्याला नकार दिला. यानंतर त्याने रागाच्या भरात लक्ष्मीवर अॅसिड हल्ला केला. यानंतर लक्ष्मीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. परंतु तिने हार पत्करली नाही. तिने 2006 मध्ये एक पीआयएल दाखल करत सुप्रीम कोर्टाकडे अॅसिड बॅन करण्याची मागणी केली.

'Stop Acid Attacks' मोहिमेदरम्यान लक्ष्मीची आलोक दीक्षितसोबत भेट झाली

लक्ष्मीला यूस फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्याद्वारे 2014 चा आंतरराष्ट्रीय महिला सन्मान पुरस्कार मिळाला आहे. 'Stop Acid Attacks' मोहिमेदरम्यान लक्ष्मीची आलोक दीक्षितसोबत भेट झाली. आलोक दीक्षित पत्रकारिता सोडून अॅसिड अटॅक पीडितांसाठी मोहिम चालवतो. आलोक आणि लक्ष्मीने एकत्रितपणे ही लढाई लढली. यादरम्यान दोघांनाही प्रेम झाले. यानंतर दोघांनी लिव्ह-इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न केले नाही परंतु त्यांची एक पीहू नावाची मुलगी आहे. पीहूच्या जन्माच्या काही दिवसांनंतर आलोक आणि लक्ष्मीने वेगळे होण्याचे ठरवले. परंतु दोघेही याबाबत कधीच काही बोलले नाही. प्रेमाचा आदर्श बनलेले आलोक दीक्षित आणि लक्ष्मी अग्रवाल यांनी वेगळा होण्याच निर्णय का घेतला हे लोकांना जाणून घ्यायचे आहे.

X
COMMENT