आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लक्ष्मी बॉम्ब'चे दिग्दर्शक बनवणार देशातील पहिले ट्रान्सजेंडर निवारागृह, अक्षय कुमारने दिली दीड कोटींची देणगी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राघव लॉरेन्सने फेसबुकवर सांगितले की, त्यांची स्वयंसेवी संस्था चेन्नईमध्ये शेल्टर होम बनवेल
  • ट्रान्सजेंडर्सवर बनलेला 'कांचना'चा हिंदी रिमेक 'लक्ष्मी बॉम्ब' 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होईल

बॉलिवूड डेस्कः अभिनेता अक्षय कुमारने चेन्नईमध्ये बनवल्या जाणा-या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर निवारा गृहासाठी दीड कोटी रुपये दिले आहेत. ट्रान्सजेंडरवर बनणार्‍या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी फेसबुक पेजवर लिहिले, शूटिंग दरम्यान अक्षयसोबत ट्रस्ट आणि चेन्नईत ट्रान्सजेंडर होम बनविण्याविषयी चर्चा झाली होती. हे ऐकताच अक्षयने ही रक्कम दान केली.

15 वर्षांपासून कार्यरत आहे राघव 

राघव गेल्या 15 वर्षांपासून लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहेत. यामध्ये शिक्षण, मुलांसाठी घर, वैद्यकीय आणि अपंग सहाय्य यासारख्या कार्याचा समावेश आहे. राघव यांनी सांगितले की, 15 वर्षे पूर्ण झाल्यावर, ट्रान्सजेंडरसाठी काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा होती, म्हणूनच त्यांनी निवारा गृह बांधण्याची बाब अक्षयसमोर ठेवली.

'लक्ष्मी बॉम्ब'चे शूटिंग पूर्ण झाले

'कांचना' या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे 'लक्ष्मी बॉम्ब', ज्याचे दिग्दर्शन राघव यांनी केले आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटातील स्टारकास्टपैकी एक असलेल्या अश्विनी काळसेकर यांनीही इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. अश्विनीने लिहिले, या चित्रपटाचे शूट अक्षयच्या टीमसोबत क्रिकेट मॅच आणि गणेश आचार्य यांनी आयोजित केलेल्या डिनरसह पूर्ण झाले.