लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काय कराल

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 03:18 PM IST

परंपरेने चालत आलेल्या काही गोष्टी केल्या तरी लक्ष्मी प्रसन्न होते

  • laxmi-kripa

    उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागला की घरात ताणतणाव उत्पन्न होऊ लागतात. प्रत्येकाला वाटते की लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असली पाहिजे. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक पूजा अनुष्ठाने करण्यात येतात. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत यासाठी वेळ काढणार कसे, हा प्रश्र आहे. अशा वेळी परंपरेने चालत आलेल्या काही गोष्टी केल्या तरी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.
    दररोज कमीतकमी 25 मिनिटे दारे खिडक्या उघडी करा. यामुळे आतील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सूर्यप्रकाशासोबत घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येईल.
    संध्याकाळी एकदा घरातील सार:या लाईट्स चालू करा, यावेळी घरात लक्ष्मी येत असते. वर्षातून एकदा दोनदा होम हवन करा. घरात अधिक कचरा जमा होऊ देऊ नका. सकाळ संध्याकाळ साहूहिक आरती करा. महिन्यातून एकदा दोनदा उपवास करा. घरात चंदन, धूप आदी सुगंध दरवळू द्या. हे उपाय करू लागा आणि अनुभव घ्या लक्ष्मीच्या वास्तव्याचा.

Trending