आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठांच्या खुर्च्यांसाठी ‘नेत्या’ झाल्या ‘कार्यकर्त्या’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील कॉग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी अशोक चौक भागात झाले.  राजकारणात ‘सतरंजी’ आणि ‘खुर्च्या’ उचलण्याचे काम कार्यकर्त्यांचे असते. मात्र माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मते खासदार, आमदार असला तरी तो पक्षाचा कार्यकर्ताच असतो. त्या विचाराने प्रणिती शिंदे यांनी व्यासपीठावर ज्येष्ठांना बसण्यासाठी स्वत: खुर्च्या उचलून दिल्या. सुशीलकुमार शिंदेंनी सर्व ज्येष्ठांना खुर्च्यांवर बसवले.