Home | Sports | Other Sports | leander paes and mahesh bhupati loss in french open

पुरूष दुहेरीत भारताच्या पेस-भूपतीचे आव्हान संपुष्टात

Agency | Update - May 29, 2011, 01:54 AM IST

गत सामन्यातील विजयी आघाडीने आत्मविश्वास दुणावलेल्या भारताच्या लिएँडर पेस व महेश भूपती या जोडीला दुसऱ्या फेरीत दारुण पराभवाचा धक्का बसला.

  • leander paes and mahesh bhupati loss in french open

    paesbhupati_258पॅरिस - गत सामन्यातील विजयी आघाडीने आत्मविश्वास दुणावलेल्या भारताच्या लिएँडर पेस व महेश भूपती या जोडीला दुसऱ्या फेरीत दारुण पराभवाचा धक्का बसला.

    फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन व एशले फिशर या जोडीने सलामीच्या विजयाने भरधाव वेगाने धावणाऱ्या पेस-भूपती या इंडियन एक्स्प्रेसला रोखून तिसऱ्या फेरीत धडक मारली. चेन्नई सुपर ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणारी पेस-भूपती ही जोडी दुहेरीत एकत्र खेळत होती. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत पेस-भूपतीविरुद्ध एशले-स्टीफन यांच्यात अटीतटीची लढत झाली.

    या लढतीत एशले-स्टीफन या जोडीने पहिल्या सेटवरच आघाडीची खेळी करून बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या सेटवर पेस-भूपती या जोडीने सावरणारी खेळी करत आघाडीला बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला.Trending