आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओप्पोला ५ वर्षांसाठी टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजकत्व, २ वर्षांत करार महाग वाटला, आता जर्सीवर बायजूस दिसेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर ओप्पो नाही, तर बायजूसचे नाव दिसेल. बायजूस टीम इंडियाचे नवे जर्सी प्रायोजक आहेत. बायजूस लर्निंग अॅप आहे. विल्स, सहारा, स्टार आणि ओप्पो यांच्यानंतर पाचवा ब्रँड आहे, ज्याचे नाव भारतीय खेळाडूंच्या टी-शर्टवर दिसेल. ओप्पोने २०१७ मध्ये जवळपास १०७९ कोटी रुपयांत जर्सीचे प्रायोजकत्व खरेदी केले होते. हा करार २०२२ पर्यंत होता, मात्र २ वर्षांतच ओप्पोला हा करार महाग वाटू लागला. त्यामुळे बायजूससोबत सामंजस्य करार करत हक्क त्यांना दिले. त्यामुळे आता बायजूसचे नाव जर्सीवर दिसेल. ओप्पो व बायजूसने बीसीसीआयला तशी सूचना दिली आहे. ते दोघांत सामंजस्य करार करून करार बदली करत आहेत. बीसीसीआयला द्विपक्षीय मालिकेतील एका सामन्यात १.५६ कोटी रुपये मिळत होते. आता ही रक्कम ॉबायजूसकडून बीसीसीआयला मिळेल. या बदलामुळे बीसीसीआयचे कोणतेही नुकसान होणार नाही. बायजूसचा करारदेखील २०२२ पर्यंत असेल, जो १५ सप्टेंबरपासून लागू होईल. म्हणजे वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघ ओप्पोच्या जर्सीवर दिसेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बायजूसच्या नाव असेल. टीम इंडियाच्या जर्सीला प्रायोजक करार करण्याची पद्धत १९९३ मध्ये झाली. आयटीसी लिमिटेड पहिले प्रायोजक होते. ज्याअंतर्गत जर्सीवर विल्सचे नाव होते. हा कारार २००२ पर्यंत चालला. त्यानंतर २०१३ पर्यंत सहाराशी करार होता. सहारा सर्वाधिक ११ वर्षे प्रयोजक राहिला. २०१४ ते २०१७ पर्यंत स्टार आणि तेव्हापासून आतापर्यंत जर्सी ओप्पोचे नाव आहे. जर्सीसह संघाचे मुख्य प्रायोजक व किट प्रायोजकदेखील आहेत. सध्या पेटीएम मुख्य आणि नाइकी किटीचे प्रायोजक आहे.

 

> बायजूस बनले भारतीय संघाचे जर्सी प्रायोजक

> जर्सीवर नव्या प्रायोजकाचे नाव १५ सप्टेंबरपासून दिसेल
> सहारा हाेते ११ वर्षेे; अाता अाेप्पाेला दाेन वर्षांची आहे संधी

 

> 1993 से 2001
स्पॉन्सर : विल्स

 

> 2002 ते 2013
स्पॉन्सर: सहारा

 

> 2014 ते 2017
स्पॉन्सर: स्टार

 

> 2017 तेे 2019
स्पॉन्सर: ओप्पो

बातम्या आणखी आहेत...