आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चिकाटी शिकावी- शरद पवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) कडून चिकाटी शिकण्याचा सल्ला दिला आहे. पवार गुरुवारी पिंपरी-चिंचवाडमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते. पवार म्हणाले, "मी असे म्हणत नाही की संघाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचे पालन करावे, पण मतदारांना भेटताना आपल्याला संघाप्रमाणे चिकाटी शिकायला हवी.'


पुढे ते म्हणाले,"लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे निराश होण्याचे काही कारण नाहीये. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा." त्यांनी सांगितले की, आमचे कार्यकर्ते मतदारांच्या घरी जातात आणि जर घरात कोणी नसेल तर पक्षाचे पॉम्प्लेट घराबाहेर टाकून निघून जातात. पण जर भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना मतदाराचे घर सकाळी बंद दिसले, तर ते संध्याकाळी परत त्याच्या घरात जाऊन मतदान करण्याचे आव्हान करतात. त्यामुळे आपणही सगळ्या मतदारांच्या घरी पोहण्याचा प्रयत्न केला पाहीजे. 


मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर पवारांनी केले वक्तव्य
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौरा आणि तेथील एका गुफेत ध्यान केल्यावर पवारांनी मोदींना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आपण पाहायला हवे मतदान कुठे जात आहे, विज्ञान कुठे पोहचले आहे आणि आपले पंतप्रधान गुफेत जाऊन ध्यान करत बसत आहेत.


मोदींच्या शपथविधीला न जाण्याचे कारण सांगितले
30 मे रोजी राष्ट्रपती भवनात मोदी सरकारच्या शपथविदी कार्यक्रमात न जाण्यावर शरद पवार म्हणाले की, मला पाचव्या रांगेत जागा देण्यात आली म्हणून नाही गेलो. माझ्याजवळ असलेल्या पासवर 'V' लिहीलेले होते. त्या 'V' चा अर्थ पाचवी रांग होती. पण आता राष्ट्रपती भनवाकडून स्पष्ट करण्यात आले की, त्या 'V'चा अर्थ व्हीव्हीआयपी असा आहे, त्यामुळे आता हा चॅप्टर क्लोज झाला आहे.


 

0