Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Learn handicraft towels, bed sheets and silk sarees

हातमागावर शिका टॉवेल, बेडशीट अन् सिल्क साड्या; प्रशिक्षण केंद्र सुरू, महिलांचा मोठा सहभाग

श्रीनिवास दासरी | Update - Aug 07, 2018, 11:38 AM IST

हातमागावरील साड्या महिलांना नेहमीच भुरळ घालतात. कॉटन, सिल्क, रेशीम, इरकल अशी नावे ऐकली तरी महिलांच्या भुवया उंचावतात.

  • Learn handicraft towels, bed sheets and silk sarees

    सोलापूर- हातमागावरील साड्या महिलांना नेहमीच भुरळ घालतात. कॉटन, सिल्क, रेशीम, इरकल अशी नावे ऐकली तरी महिलांच्या भुवया उंचावतात. त्या बनतात कशा, याची उत्कंठाही असते. ती पुरी करण्यासाठी वस्त्रोद्याेग खात्याने सोलापुरात हातमाग प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. पूर्वभागातील साईबाबा चौकातल्या या केंद्रात टॉवेल, बेडशीट आणि सिल्क साड्या विणण्याचे प्रशिक्षण मिळेल. शिवाय दररोज २१० रुपयांचे विद्यावेतनही. खास महिलांना हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.


    केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले अाहे. केंद्राच्या योजनेतूनच सोलापूरला 'हँडलूम क्लस्टर' मंजूर झाले. त्यासाठी १ कोटी ६७ लाख रुपये मंजूर केले. पैकी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १८ लाख १० हजार रुपये मिळाल्याचे वस्त्रोद्योग खात्याचे अधिकारी परमेश्वर गदगे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "प्रशिक्षणासाठी साईबाबा चौकातील श्रीनिवास अनंतुल यांच्या घरजागेची निवड केली. तिथे चार हातमाग कार्यान्वित केले. २० जणांनी प्रवेश घेतला. ४५ दिवसांच्या या प्रशिक्षणात रोज तीन तासांचे प्रशिक्षण देण्यात येते. राजेशम सादूल, राजू काकी हे प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळेल. पुढे त्यांना स्वयंरोजगारासाठी बँकेमार्फत अर्थसाहाय्यही. बेरोजगार युवक, महिलांनी यात सहभागी व्हावे."


    हातमाग क्लस्टर उभारल्यानंतर उत्पादक विणकरांना सामूहिक सुविधा देण्यात येतील. त्यात डिझाइन हा महत्त्वाचा भाग असेल. त्याचा पॅटर्न ठरला, की त्यानुसार सूतरंगणी होते. त्याचे विशेष प्रशिक्षणही देण्याचे नियोजन आहे. एकेकाळी सोलापूर हातमागांचे शहर होते. यंत्रमाग आल्यानंतर ते लयास गेले. परंतु दक्षिण भारतात अजूनही हातमागावरील नावीन्यपूर्ण उत्पादनांना मोठी बाजारपेठ आहे. शासनाकडून लाभाच्या योजना आहेत. त्याच्या माध्यमातून सोलापूरला गतवैभव अाणण्याचे हे प्रयत्न आहेत.

    - परमेश्वर गदगे, नोडल अधिकारी

Trending