Market / ११ कारणांद्वारे जाणून घ्या सोने का महाग होतेय आणि सेन्सेक्स का घसरतोय?

दिवाळीपर्यंत सोने ओलांडू शकते ४२ हजार रुपयांचा टप्पा, सोन्याच्या दरवाढीमागील ही ७ प्रमुख कारणे

धर्मेंद्रसिंह भदौरिया

Aug 18,2019 10:01:00 AM IST

मुंबई - सोन्याचा दर सतत वाढत आहे, तर शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. गेल्या ७५ दिवसांत वायदा आणि स्पाॅटमध्ये सोन्याच्या दरात जवळपास १६ ते १७ टक्के वाढ नोंदली गेली आहे, तर शेअर बाजारात सात टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली आहे. केडिया कमोडिटीचे प्रमुख अजय केडिया यांनी सोन्याच्या दरात आलेल्या झळाळीबद्दल सांगितले की, सोन्याचा दर लवकरच एका तोळ्यास ४० हजारांचा टप्पा ओलांडेल. दिवाळीपर्यंत दर ४२ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जेम्स अँड ज्वेलरी फाउंडेशनचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवालही केडिया यांच्या मतांशी सहमत आहेत की, पहिल्यांदाच एमसीएक्सपेक्षा खाली सोने आहे. पुढे सण आणि विवाहाचा हंगात सुरू होईल, यामुळे सोन्याच्या दरात घसरणीची शक्यता नाही. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर तोळ्याला ४० ते ४२ हजार रुपयांपर्यंत जाईल.


केआर चौकसी सिक्युरिटीजचे मुख्य देवेन चौकसी यांनी सांगितले की, विदेशी गुंतवणूकदार, एफआयआय यांच्याद्वारे िनधी काढून घेणे, मंदी येण्याची शक्यता, ऑटो, रियल इस्टेट क्षेत्रात वाढ होत नसल्याने घसरण सुरू आहे.


शेअर बाजारातील घसरणीची चार प्रमुख कारणे

१. सुपर रिचवर कर वाढणे आणि एफपीआयच्या नियमांमुळे शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. सरकारने त्याचा पुनर्विचार करण्याचे म्हटले आहे. मात्र, सध्या नकारात्मक प्रभाव पडला आहे. तसेच गेल्या वर्षी लाँग टर्म गेेन टॅक्स लावल्यामुळेही इक्विटी बाजारातील तेजीवर विराम लागण्यास सुरुवात झाली.
२. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आकडे आले आहेत. निफ्टीत नोंदणी असलेल्या कंपन्यांच्या फायद्याचा अंदाज १२ टक्के होता. मात्र, फायदा अंदाजापेक्षा कमी ५ टक्के कमी राहिला.
३. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस न होणे आणि महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरातमध्ये पुरामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता.
४. आॅटो सेक्टरमध्ये विक्रीत घसरण, रियल इस्टेट क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे वाढ न होणे आणि मागणी घटणे. जीडीपी वाढीचा दर सात टक्क्यांपेक्षा कमी राहण्याच्या अंदाजामुळे शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम राहिला आहे.

सोन्याच्या दरवाढीमागील ही ७ प्रमुख कारणे

1.अर्थसंकल्पात २.५ टक्के आयात ड्यूटी वाढवण्याची घोषणेमुळे देशातील बाजारात सोन्याचे दर वाढले.
2.आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड आणि जागतिक बँकेच्या अहवालात जागितक अर्थव्यवस्थेत स्थिरता आल्याचे म्हटले आहे. यामुळेही सोन्यात गुंतवणूक वाढली आहे.
3.भारतातील आरबीआय, चीन, रशिया, तुर्कस्तानसहित जगातील अनेक केंद्रीय बँकांनी सोने खरेदी करत राखीव साठा वाढवला आहे. जागतिक सोने परिषदेच्या माहितीनुसार जगातील केंद्रीय बँकांनी २०१९-२०मध्ये आतापर्यंत सुमारे ३७४ मेट्रिक टन सोन्याची खरेदी केल्याचा अंदाज आहे. आरबीआयने मार्च २०१८ पासून आतापर्यंत ६० टन सोने खरेदी केले आहे.
4.अमेरिकेने ११ वर्षांत पहिल्यांदा व्याजदरात कपात केली आहे. जेव्हाही अमेरिकेत व्याजदरात कपात होते तेव्हा सोन्याचे दर वाढतात.
5.अमेरिका- चीनदरम्यानचे व्यापार युद्धही समस्या आहे. जगाच्या व्यापारात मंदीचे वातावरण आहे. यामुळे खासकरून आशियायी देशांतील चलन कमकुवत झाले आहे.
6.डाॅलरच्या तुलनेत रुपयातही घसरण सुरू आहे. सध्या रुपया ७१ च्या पातळी खाली गेला आहे. भारतात मागणीच्या ८० टक्के सोने आयात होते, यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत.
7.अमेरिका- इराणदरम्यान तणाव कायम आहे. यामुळे सोने खरेदी वाढली आहे.

७५ दिवसांत सेन्सेक्समध्ये ७ % घसरण, सोने दरात १७% ने वाढ

X
COMMENT